पुण्यासह ‘या’ 5 शहरांत दिवाळीनंतर देखील बँका बंद, गैरसोय टाळण्यासाठी उरकून घ्या व्यवहार

पोलीसनामा ऑनलाइन टीम – यंदा सणासुदीच्या दरम्यान बँकांना बऱ्याच सुट्या असणार आहेत. त्यामुळे बँकिंग व्यवहार या सुट्ट्यांआधीच उरकणे फायदेशीर ठरेल. यंदा दिवाळी रविवारी आली आहे. त्यानंतर पुणे शहरातील बँकांसह इतर अनेक शहरातील बँका बंद असण्याची शक्यता आहे. बँक अतिरिक्त सुट्ट्या घेणार आहे. ही सुट्टी सोमवारी असू शकते. पुणे, मुंबई, बेंगळुरु, नागपूर, अहमदाबाद या शहरातील बँका अतिरिक्त सुट्ट्या घेण्याच्या तयारीत आहेत.

या आठवड्यात शुक्रवारनंतर शनिवारी आणि त्यानंतर रविवारी देखील सुट्टी असेल. कारण या महिन्यात चौथा शनिवार आहे. यानंतर रविवारी तर बँकांना साप्ताहिक सुट्टी असणारच आहे. या दरम्यान देशभरात दिवाळी साजरी करण्यात येईल. रविवारी दिवाळी आणि त्यानंतर नेगोशिएबल इंस्ट्रूमेंट अ‍ॅक्ट अंतर्गंत देशातील अनेक शहरात बँका बंद असतील. मोठ्या शहरात लखनऊ आणि कानपूरमध्ये बँका सोमवारी आणि मंगळवारी नेगोशिएबल इंस्ट्रुमेंट अ‍ॅक्ट अंतर्गंत बंद असू शकतात, मंगळवारी भाऊबीज असेल.

बंगळूरुसह कर्नाटकात बँका सोमवारी सुरु असतील तर मंगळवारी बँक बंद राहतील. परंतू सोमवारी पुणे शहरात बँका बंद असल्याने ग्राहकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. कारण लक्ष्मीपूजनानंतर लागोपाठ दोन दिवस पाडवा आणि भाऊबीज असणार आहे.

Visit : Policenama.com