ईडीकडून गुन्हा दाखल झाल्याच्या निषेधार्थ बुधवारी ‘बारामती बंद’ची हाक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी शरद पवार, अजित पवार यांच्यासह एकूण सत्तर जणांवर ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्या अडचणींमध्ये भर पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याने बुधवारी (दि.25) बारामती बंदची हाक देण्यात आली आहे.

राज्य सहकारी बँक घोटाळाप्रकरणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ बुधवारी बारामती बंद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बारामती मधील सर्व व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून या घटनेचा निषेध करावा असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच शहरातील शारदा प्रांगणात होणार निषेध सभा होणार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने मनमानीने कर्ज वाटप केलं होतं. त्यामुळे या बँकेला १० हजार कोटींचं नुकसान झालं होतं. हा घोटाळा २५ हजार कोटींवर गेला. या प्रकरणी अण्णा हजारे यांनी तीन वर्षांपूर्वीच याचिका दाखल केली होती. याप्रकरणी चौकशी समितीही नेमण्यात आली. २००१ मध्ये रिझर्व्ह बँकेने राज्य सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केले. त्यानंतर चौकशीचेही आदेश दिले होते.

Visit : policenama.com