बारामतीतील मॉलच्या पार्किंगमध्ये मुलाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

बारामती : पोलीसनामा ऑनलाईन – मॉलमध्‍ये वरुन पडून चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बारामती एमआयडीसी परिसरातील सुभद्रा मॉलमध्ये घडली आहे. पार्थ प्रशांत हिंगाने (वय ५) असे या चिमुकल्याचे नाव असून रविवारी रात्री ही घटना घडली. मॉलच्या जिन्याला नसलेल्या ग्रिलमुळे पार्थ याचा मृत्यू झाला आहे. या मॉलमध्ये लहान मुलांसाठी गेम झोन सुरू करण्यात आला आहे. पार्थ याच्या मृत्युमुळे पालक वर्गामध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पार्थ याचे वडील प्रशांत हिंगाने यांच्या वडिलांचे सुभद्रा मॉलमध्ये श्रीपाद फॅशन वर्ल्ड नावाचे दुकान आहे. रात्री ८ वाजल्यापासून पार्थ बेपत्ता होता. त्याचे नातेवाईक, पोलिस सर्व मिळून शोध घेत होते. मॉलच्या पार्किंगमध्ये त्याचा मृतदेह आढळून आला. काल तो खेळता – खेळता पडला असावा, अशी पोलिसांनी शक्यता व्यक्त केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्‍यूची नोंद केली आहे. संतापजनक प्रकार म्हणजे पार्थ याच्या मृत्यूनंतर देखील मॉलमधील मल्टिफ्लेक्स चित्रपट गृहामध्ये चित्रपट सुरू ठेवण्यात आला होता.

आरोग्यविषयक वृत्त –

वाहतूक कोंडीमुळे मुंबईकरांच्या श्वसनविकारमध्ये वाढ

देहूत महिलांसाठी विनामूल्य कॅन्सर तपासणी

अशुद्ध रक्ताने भेडसावते पिंपल्स आणि थकव्याची समस्या

पहाटे सेक्स केल्याने हार्ट अटॅकचा धोका होतो कमी