Baramati Lok Sabha Elections | बारामती लोकसभा मतदारसंघ: पवार कुटुंब रणांगणात समोरासमोर उभे ठाकल्यास ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ सारख्या प्रादेशिक पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण होणार !

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Baramati Lok Sabha Elections | बारामती लोकसभा मतदार संघात खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे. ‘लोकसभा’ निवडणुकिच्या निमित्ताने पवार कुटुंब रणांगणात समोरासमोर ठाकल्यास शिवसेनेपाठोपाठ (Shivsena) ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ (NCP) सारख्या प्रादेशिक पक्षाचे अस्तित्व संपुष्टात येण्याची शक्यता राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व्यक्त करू लागले आहेत. (Baramati Lok Sabha Elections)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी जाहीर सभेत ७० हजार कोटी रुपयांचा कथित सिंचन घोटाळा आणि राज्य सहकारी बँकेतील घोटाळ्यावरून नामोल्लेख टाळत आरोप केल्यानंतर अवघ्या काही दिवसांत अजित पवारांच्या नेतृत्वाखाली आमदारांचा मोठा गट राज्यातील भाजप – शिवसेनेच्या सत्तेत सहभागी झाला. शरद पवार (Sharad Pawar) यांचे विश्वासू छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांच्यासारख्या मातब्बर नेत्यांनी देखील अजित पवार यांचीच साथ दिली. यामुळे शरद पवार यांच्याबद्दल सहानुभूतीची लाट निर्माण झाली. निवडणुक आयोग आणि विधानसबा अध्यक्षांनी पक्ष आणि पक्षचिन्ह अजित पवार यांच्याकडेच राहील, असा निर्णय दिल्यानंतर अजित पवार यांनी थेट ‘काका’ शरद पवार यांच्यासह ‘बहीण’ खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर ‘होम पीच’ बारामतीमध्ये शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासह सर्व पवार कुटुंबावर व्यक्तिगत टीका केल्याने त्यांची अगतिकता अधिकच दिसून आली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांना मानणार्‍या मतदारांमध्ये अजित पवार हे कोणाच्या तरी ‘स्क्रिप्ट’ नुसार बोलत असल्याचा संशय बळावू लागला आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधून फुटलेल्या गटाने भाजपसोबत राज्यात सरकार स्थापन केले आहे. लोकसभा निवडणुकीचे जागा वाटप लवकरच ठरेल. मात्र, सहा महिन्यांनी होणारी विधानसभा आणि त्यानंतर होणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत युती होणार की नाही, याबाबत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एकही नेता स्पष्टपणे बोलत नाही. यामुळे दुसर्‍या, तिसर्‍या फळीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना त्यांच्या भविष्याची चिंता सतावू लागली आहे. हे पदाधिकारी आगामी विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी त्यांच्या कार्यक्षेत्रातील ठोकताळे मांडू लागले आहेत. स्थानीक पातळीवर जनतेपुढे जाउन ज्यांच्यासाठी मते मागीतली आणि विरोधकांवर आरोप केले, सोशल मिडीयातून वाभाडे काढले तोच उमेदवार कसा आयोग्य आहे, हे सांगायचे हा विचारच पटत नसल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनेक कार्यकर्ते खाजगीमध्ये बोलू लागले आहेत.

खुद्द बारामतीमध्येही अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर्स झळकत आहेत.
परंतू ते मुख्यमंत्री कसे होणार? त्यांना भाजपने शब्द दिला आहे? भाजपने शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद
दिले आहे तसे अजित पवारांना दिले तर शिंदे आणि शिवसेनेची भुमिका काय राहाणार? पवार अथवा शिंदे यांच्यापैकी
एकाला भविष्यात मुख्यमंत्री दिले तर राज्यातील भाजपचा मुख्य चेहेरा देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा बाजुला जावे लागणार.
अशा परिस्थितीत त्यांना मानणारा भाजपचा कार्यकर्ता आणि मतदार शिवसेना आणि राष्ट्रवादीला मदत करणार? मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेतून उमेदवार पाडापाडीचे राजकारण झाल्यास कोणाचे नुकसान होणार? अशा अनेकविध विषयांवर राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या चर्चांचे फड रंगू लागले असून पक्षासोबतच स्वत:च्या अस्तित्वाबाबत चिंतेचा सूर व्यक्त करू लागले आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune CP Amitesh Kumar | पोलीस आयुक्त अमितेश कुमार अ‍ॅक्शन मोडवर! पब, बार, रेस्टो बार, रूफ टॉप हॉटेल, क्लब आणि हुक्का पार्लर संदर्भात पुणे पोलिसांचा मोठा निर्णय (Video)

Pune Crime Branch | पुणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई! ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश, साडेतीन कोटी रुपयांचे एम.डी जप्त (Video)

Namo Chashak 2024 In Pune | नमो चषक जिल्हास्तरीय शिवकालीन युद्धकला (सिलंबम) स्पर्धा संपन्न

50 लाखांच्या खंडणीसाठी दहा वर्षांच्या मुलाचे अपहरण; पोलिसांनी केली सुखरूप सुटका