Barshi Fire | बार्शी हादरले! शोभेच्या दारु कारखान्यात भीषण स्फोट, 5 जणांचा मृत्यू तर 25 जण गंभीर

0
698
Barshi Fire | barshi shook shirale pangri road explosion at firecracker factory five dead 25 seriously injuered
File Photo

बार्शी/सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – सोलापूर जिह्यातील बार्शी तालुक्यातील (Barshi Fire) पांगरीमध्ये फटका फॅक्टरीमध्ये भीषण स्फोट (Pangri Fatke Factory Blast) झाला आहे. यामध्ये 5 कामगारांचा मृत्यू (Death) झाला तर 25 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. फॅक्टरीमध्ये फटाके बनवण्याचे काम सुरु (Barshi Fire) असताना भीषण स्फोट झाला. स्थानिकांच्या माहितीनुसार या घटनेत पाच कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालाय. परंतु प्रशासनाने याला अद्याप दुजोरा दिलेला नाही. या घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे

 

प्राथमिक माहितीनुसार, स्फोट झाला त्यावेळी कंपनीमध्ये 40 कामगार काम करत होते. स्थानिकांच्या माहितीनुसार 25 कर्मचारी जखमी झाले आहेत. अग्निशमन दल (Fire Brigade), पोलीस (Police) आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहेत. ही घटना पांगरी शिराळा रस्त्यावर असलेल्या एका फटाक्याच्या कारखान्यात घडली. घटनेनंतर मोठा आवाज परिसरात झाला. तसेच धुराचे आणि आगीचे लोट परिसरात दिसून येत होते. (Barshi Fire)

 

पांगरी गावाजवळ रविवारी दुपारी चारच्या सुमारास भीषण घटना घडली. ही फटाक्याची फॅक्टरी गेल्या दहा वर्षांपासून सुरु आहे. या फॅक्टरीत आसपासच्या गावातील कामगार कामासाठी येत होते. आज चारच्या सुमारास फॅक्टरीमध्ये फटाके बनवण्याचे काम सुरु असताना भीषण स्फोट झाला. यात काही कामगारांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर गंभीर जखमी झालेल्या कामगारांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

अजूनही बचावकार्य सुरु असून आगीचे लोट मोठ्या प्रमाणत पसरल्याने बचावकार्यास अडथळा निर्माण होत आहे.
सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे (Solapur Rural Police) वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून
बार्शी, कुर्डूवाडी, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, टेंभुर्णी आदी भागातील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

 

 

Web Title :- Barshi Fire | barshi shook shirale pangri road explosion at firecracker factory five dead 25 seriously injuered

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा