Diabetes Diet | ब्लड शुगर हाय असेल तर फॉलो करा ‘हा’ विशेष प्रकारचा डाएट, रिझल्ट पाहून व्हाल आश्चर्यचकीत!

नवी दिल्ली : Diabetes Diet | डायबिटीज या धोकादायक आजारापासून बचाव करण्यासाठी निरोगी आहार, निरोगी जीवनशैली आणि नियमित व्यायाम आवश्यक आहे. ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित ठेवणारा विशेष आहार जाणून घेऊया. (Diabetes Diet)

मेडिटेरियन डाएट हा ग्रीस, इटली आणि स्पेन सारख्या भूमध्य समुद्रालगत असलेल्या देशांच्या पारंपारिक पाककृतींवर आधारित खाण्याची एक पद्धत आहे. यामध्ये सामान्यतः फळे, भाज्या, धान्य, शेंगा, नट आणि बिया यासारखे संपूर्ण, कमीतकमी प्रक्रिया केलेले पदार्थ असतात. आहारात प्रोटीनचे प्राथमिक स्त्रोत म्हणून मासे आणि सीफूड, मध्यम प्रमाणात चिकन, डेअरी आणि अंडी यांचा समावेश असतो. मेडिटेरियन डाएटमध्ये रेड मीट आणि मिठाईचे सेवन कमी प्रमाणात केले जाते. (Diabetes Diet)

संशोधन काय म्हणते?

संशोधनातून असे दिसून आले आहे की मेडिटेरियन डाएटचे पालन करणे डायबिटीज रुग्णांसाठी लाभदायक आहे. हा डाएट कमी ग्लायसेमिक इंडेक्सची धान्य, फळे आणि भाज्यांवर भर देऊन ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित करतो. हे पदार्थ जेवणानंतर ब्लड शुगर लेव्हल वाढण्यापासून रोखतात. याव्यतिरिक्त, मेडिटेरियन डाएट मोनोअनसॅच्युरेटेड फॅट युक्त असतो, ज्याचा इन्सुलिन सेन्सिटिव्हवर सकारात्मक प्रभाव दिसून आला आहे.

हृदयही राहते निरोगी

प्रोटीनचा स्रोत म्हणून सॅल्मन सारख्या फॅटी माशांचा समावेश केल्याने ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड मिळते.
ज्याचा संबंध हृदयाचे आरोग्य सुधारण्याशी जोडला गेला आहे.
सामान्यतः डायबिटीज संबंधित हृदयाच्या समस्यांचा धोका कमी होतो.
एकंदरीत, मेडिटेरियन डाएटमध्ये पोषकतत्व युक्त आणि लो-ग्लायसेमिक पदार्थांवर लक्ष केंद्रित केले जाते,
ज्याचा डायबिटीज असलेल्या व्यक्तींना फायदा होतो.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Constipation | बद्धकोष्ठतेमुळे होऊ शकतो कॅन्सर, आजपासूनच डाएटमध्ये करा ‘हे’ बदल

Kidney Stone | सनी देओलला होता किडनीचा ‘हा’ भयंकर आजार,
उपचारासाठी जावे लागले होते अमेरिकेला