’या’ 5 चुकांमुळे शौचालयाच्या माध्यमातून पसरतात ‘हे’ आजार, वेळीच व्हा सावध

निरोगी राहण्यासाठी घर आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणं खुप गरजेचं असतं. स्वच्छतागृहांमध्ये व्यवस्थित साफ सफाई न केल्यास आजार पसरण्याचा धोका प्रचंड वाढतो. यातून संक्रमण पसरून तुम्ही आजारी पडू शकता. लहान मुलांना याचा लवकर त्रास होऊ शकतो. यासाठी कोणती काळजी घ्यावी, ते जाणून घेवूयात…

अशी घ्या काळजी

1 टूथ ब्रश योग्य ठिकाणी ठेवा
टॉयलेट फ्लशमुळे व्हायरस आणि बॅक्टेरिया अन्य वस्तूंप्रमाणेच ब्रशला सुद्धा संक्रमित करू शकतात. यासाठी दात स्वच्छ केल्यानंतर ब्रश धुवून सुरक्षित ठिकाणी ठेवा. ब्रश पॉटपासून लांब ठेवा.

2 टॉवेलची स्वच्छता
टॉवेल नियमित धुवा. अस्वच्छ आणि संक्रमित टॉवेलने आजार पसरतात. ओला टॉवेल बाथरूमध्ये वाळत घातल्यानं लहान लहान मायक्रोऑर्गेनिझ्मस निर्माण होऊन आजार पसरू शकतात.

3 टॉयलेट सीट बंद करा
टॉयलेटचा वापर केल्यानंतर सीटचं झाकण आठवणीने बंद करा. अनेक रिसर्चमधून दिसून आलं आहे की, टॉयलेट सीट उघडी ठेवल्याने हवेतून पसरणारे बॅक्टेरिया आणि व्हायरस भांड्यातून बाहेर येतात. यामुळे आजारांची लागण होऊ शकते.

4 चपलेचा वापर
शौचास जाताना नेहमी चप्पल वापरा. चप्पल वापरत नसाल तर शौचास जाऊन आल्यानंतर पाय आणि हात स्वच्छ धुवा.

5 केमिकल्सचा वापर
बाथरूम स्वच्छ करण्यासाठी अतिप्रमाणात केमिकल्सचा वापर केल्याने अस्थमा, शिंका येणं, एलर्जी अशा समस्या होऊ शकतात. गर्भवती महिलांनाही त्रास होऊ शकतो. केमिकल्सयुक्त उत्पादनांचा वापर टाळा.