‘कोरोना’मुळे रद्द होणार IPL 2020 ? BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सोडले मौन, म्हणाले…

पोलिसनामा ऑनलाईन – परदेशातही इंडियन प्रीमियर लीगच्या 13व्या सीझनवर पुन्हा एकदा कोरोनाचे सावट दिसत आहे. कोरोना व्हायरसमुळे आयपीएलचा 13वा सीझन ठरलेल्या वेळी पार पडू शकला नाही. बीसीसीआयने यूएईमध्ये 13व्या सीझनच्या आयोजनाचा निर्णय घेतला. परंतु, टुर्नामेंटला सुरुवात होण्याआधीच चेन्नई सुपर किंग्सच्या 12 जणांना कोरोनाची लागण झाली.

सीएसकेचा संघ एक आठवडाआधी दुबईत दाखल झाला होता. त्यादरम्यान करण्यात आलेल्या कोरोना चाचणीत चेन्नई सुपर किंग्सचे 12 खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा कोरोनामुळे आयपीएल रद्द करण्यात येणार का? असा प्रश्न विचारण्यात येऊ लागला आहे. अशातच बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी यावर मौन सोडले आहे. चेन्नई सुपर किंग्समधील खेळाडू पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. याप्रकरणी मी काहीच करू शकत नाही. आता आम्ही आयपीएलचे 13 वे सीझन 19 सप्टेंबरपासून सुरु होणार की नाही? याबाबत काहीच सांगू शकत नाही. आम्ही अशी अपेक्षा करत आहोत की, इंडियन प्रीमियर लीगचे आयोजन व्यवस्थित पार पडेल. आयपीएलचा संपूर्ण कार्यक्रम बराच वेळ सुरु राहणार आहे. त्यामुळे आम्ही सर्व काही सुरळीत पार पडेल असे गांगुलीने म्हटले आहे.