IT नं दिला सावधानतेचा इशारा ! कोणत्याही लिंक वर ‘क्लिक’ करू नका, होऊ शकते मोठी फसवणूक, जाणून घ्या
नवीदिल्ली : वृत्तसंस्था – ऑनलाइन पद्धतीचे व्यवहार वाढत असल्यामुळे सायबर क्राईममध्ये देखील वाढ होत चालली आहे. त्यामुळेच आता इनकम टॅक्स विभागाने अलर्ट जारी केला आहे. तुम्हाला आलेला मेसेज, इमेल यामधील लिंकवर विचार पूर्वक क्लीक करा अन्यथा तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते. असा इशारा ग्राहकांना देण्यात आला आहे.
आयकर विभाग किंवा बँक यांच्या खोट्या नावाने ग्राहकांना मेसेज किंवा मेल पाठवले जातात आणि त्यामधून ग्राहकांची फसवणूक होते. या आधी देखील टॅक्स रिटर्न भरण्यासाठी दिलेल्या मुदती आधी अशा प्रकारे खोटे मेसेज ग्राहकांना पाठवण्यात आले होते.
तुम्हाला एखादी ऑफर किंवा इशारा देण्यासाठी लिंक पाठवली जाते मग तुम्ही त्यावर क्लीक करता आणि पुढे असे काहीतरी लिहिलेले असते जे पाहून तुंही आपली बँकेची किंवा कार्डची माहिती त्या ठिकाणी टाकता आणि यामुळे तुमची फसवणूक होते. अशा प्रकारची अनेक प्रकरणे समोर आली आहेत म्हणून अशा प्रकारच्या कोणत्याही लिंक किंवा मेसेजकडे लक्ष देऊ नका असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
आयकर विभागाने जारी केले ईमेल
@incometax.gov.in @incometaxindiaefiling.gov.in,@tdscpc.gov.in, @cpc.gov.in, @nsdl.co.in, @utiitsl.com, @insight.gov.in
SMS सोर्स कोड-
ITDEPT, ITDEFL, TDSCPC, ITDCPC, CMCPCI, INSIGT, SBICMP, NSDLTN, NSDLDP, UTIPAN
इनकम टॅक्स विभागाच्या अधिकृत वेबसाइट
http://www.incometaxindia.gov.in
http://www.incometaxindiaefiling.gov.in
खोटे मेसेज किंवा मेल आल्यास काय कराल ?
करदात्यांना खोटा SMS किंवा ई मेल आला तर त्यांना इन्कम टॅक्स विभागाच्या वेबसाईटवर भेट देऊन तिथे तक्रार पर्याय निवडा http://[email protected] किंवा http://[email protected] या वेबसाईटवर भेट देऊन तुम्ही तक्रार दाखल करू शकता.
- ‘ही’ आहेत कानाच्या ‘कॅन्सर’ची 7 लक्षणे; चुकूनही करू नका दुर्लक्ष !
- दर 20 मिनिटांनी ‘वॉक ब्रेक’ घ्या, हृदयरोग असूनही मिळेल ‘लाँग लाईफ’ !
- ‘या’ 5 पदार्थांमुळे वाढतो ‘ताण’; मेंदूसाठीही ठरतात घातक !
- ‘या’ 4 घरगुती उपायांनी मिळवा खोकल्यापासून सुटका !
- ‘नागीण’ आजाराची ‘ही’ आहेत 4 कारणे, जाणून घ्या यावरील उपाय
- बहुगुणकारी ‘लवंग’ चे सेवन करा आणि ‘या’ 5 समस्यांतून मुक्तता मिळवा
- ‘न्यूमोनिया’ वर गुणकारी ठरतात ‘हे’ 5 घरगुती उपाय !