बारबालानं ग्राहकांसोबत झोपण्यास दिला ‘नकार’, मालकासह चौघींनी तिला नग्न करून ‘मारलं’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ग्राहकांसोबत संबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या बारबालेला नग्न करून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना तेलंगणातील हैदराबाद येथील बेगमपेठ येथे घटली आहे. पीडित महिलेने तिच्यासोबत नाचणाऱ्या अन्य चार महिलां आणि एका पुरुषावर मारहाण केल्याचा आरोप केला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी चार महिला आणि एका पुरुषाला अटक केली आहे. तर एकजण फरार झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला डान्स बारमध्ये कामासाठी आल्यानंतर काही दिवसांनी हॉटेल व्यवस्थापकाने तिच्यावर ग्राहकांसोबत संबंध ठेवण्याचा दबाव टाकला. परंतु तिने याला नकार दिल्यानंतर तिच्यावर ब्लेडने वार करण्यात आले असे पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
पीडित महिलेने सांगितले की, नेहमीप्रमाणे ती काल बार बंद झाल्यानंतर रात्री एकच्या सुमारास घरी जात होती. त्यावेळी चार मुलींनी आणि एका व्यक्तीने तिच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी नग्न करून तिच्यासोबत गैरव्यवहार करण्याच प्रयत्न केला. याप्रकरणी पंजागुट्टा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

चित्रपटात काम करण्यासाठी हैदराबादमध्ये आली
चित्रपटात काम मिळेल या उद्देशाने पीडित महिला हैदराबादमध्ये आली होती. याच दरम्यान तिला आर्थिक अडचणी आल्याने तिने परवाना असलेल्या डान्स बारमध्ये काम करण्यास सुरु केले. त्यावेळी डान्सबारमध्ये आलेल्या ग्राहकांनी दारूच्या नशेत तिच्यासोबत गैरव्यवहार करण्याच प्रयत्न केला. तसेच एका ग्राहकाने तिला संबंध ठेवण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला. याकडे दुर्लक्ष करून तिने काम सुरु ठेवले. याच दरम्यान एका ग्राहकाने तिला संबंध ठेवण्यासाठी गुजरातला येण्यासाठी दहा हजार रुपये देऊ केले. मात्र तिने नकार दिल्यावर तिच्यावर दबाव टाकण्यात आला असे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे..