शिळ्या पोळीपासून स्क्रब आणि फेस पॅक कसा बनवायचा ?, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – आपल्या सर्वांच्या घरात बर्‍याचदा शिळी पोळी शिल्लक राहतेच पण बहुतेक लोक प्राण्यांना खायला घालतात किंवा फेकून देतात. परंतु शिळी पोळी आरोग्यासाठी थोड्या प्रमाणात फायदेशीर आहे. परंतु ती शिळी झाल्याने त्याच्या चवीमुळे आपण ती खात नाही. आपणास माहित आहे का शिळ्या पोळीने आपण चेहऱ्यासाठी नैसर्गिक स्क्रब आणि फेस पॅक तयार करू शकता. पोळीमध्ये भरपूर फायबर असते, जे स्क्रब तयार करण्यासाठी सर्वात महत्वाचे साहित्य आहे. फेस पॅक आणि स्क्रब बनवताना घरातील इतर घटक मिसळल्यास ते अधिक प्रभावी होते. चेहऱ्यावर हा पॅक आणि स्क्रब लावल्याने कोणताही दुष्परिणाम होत नाही. जाणून घेऊया पोळीच्या मदतीने फेस स्क्रब आणि फेस पॅक कसा बनवायचा …

फेस पॅक बनवायचे साहित्य
– शिळी पोळी – १/२

– सफरचंद – १/२

– दही – १ चमचा

– संत्र्याची साल किंवा चंदन पावडर – १ चमचा

फेस पॅक बनविण्याची पद्धत
फेस पॅक बनविण्यासाठी, सर्व साहित्य बारीक करून मिश्रण तयार करा. आता हे मिश्रण एका भांड्यात काढून ब्रशच्या सहाय्याने आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा. ते लावून झाल्यानंतर २० मिनिटे तसेच ठेवा. नंतर त्यास साध्या पाण्याने धुवा.

फेस पॅक लावण्याचा फायदा
शिळ्या पोळीने बनलेला हा फेस पॅक लावल्यास त्वचेच्या सुरकुत्या हळूहळू कमी होऊ लागतील. तसेच त्वचेवरील डागही दूर होतील आणि चेहऱ्यावर चमक येईल.

फेस स्क्रब बनविण्याचे साहित्य
– शिळी पोळी – १/२

– नारळ / ऑलिव्ह किंवा कोणतेही तेल – २ चमचे

– साखर – १ चमचा

– कॉफी पावडर – १ चमचा

– मध – १/२ चमचे

स्क्रब बनवण्याची पद्धत
स्क्रब तयार करण्यासाठी पोळी आणि तेल यांचे बारीक मिश्रण करा. नंतर हे मिश्रण एका भांड्यात काढून नंतर बाकीचे साहित्य टाकून मिश्रण करा. जर मिश्रण कोरडे असेल तर त्यात गुलाब पाणी किंवा थोडे अधिक मध घाला.

फेस स्क्रब लावण्याचा फायदा
हे स्क्रब चेहऱ्यावर लावल्यास खोलवर चेहरा स्वच्छ होते. यामुळे ब्लॅकहेड आणि व्हाइटहेड दोन्ही अदृश्य होते. आपण शरीरावर लावून जर ते स्क्रब केले तर ते बॉडी पॉलिशिंगसारखे प्रभाव देईल. हे स्क्रब लावल्याने त्वचा कोरडी होत नाही किंवा त्याचे दुष्परिणामही होत नाहीत.

You might also like