हिवाळ्यात त्वचा कोरडी होत असेल तर ‘या’ पध्दतीनं तुपाचा वापर करा, जाणून घ्या

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – तूप हे प्रत्येक घरात उपलब्ध असते. सर्व आवश्यक पौष्टिक तत्व तूपात आढळतात आणि आरोग्यासाठी हे फायदेशीर ठरते. तूप त्वचेसाठी फायदेशीर आहे हे फारच कमी लोकांना माहिती आहे. आयुर्वेदात तूप हे औषध म्हणून वापरले जाते. तूप त्वचेवर चमक आणण्यासाठी कसे कार्य करते. हे आपण जाणून घेऊया..

तुपापासून मॉइश्चरायझिंग क्रीम बनवा – तूपापेक्षा चांगली मॉइश्चरायझर क्रिम होऊ शकत नाही. तूप त्वचेला हायड्रेट करते आणि डाग देखील नाहिशे होतात, ज्यामुळे त्वचा ग्लो करते. त्वचेला मऊ बनवण्यासाठी कच्च्या दुधात तूप घाला ते आपल्या त्वचेवर लावा आणि हळू हळू मालिश करा. ते 15 मिनिटांनंतर धुवा.

फाटलेल्या ओठांपासून मुक्तता – प्रत्येक हिवाळ्यामध्ये ओठ फाटतात. हिवाळ्यात ओठांना तूप लावल्याने ते मऊ होतात. झोपण्याच्या आधी ओठांवर थोड्या प्रमाणात तूप लावा. काही मिनिटे मालिश करा. दुसर्‍या दिवशी सकाळी पाण्याने धुवा.

हिवाळ्यात केसांची समस्या वाढते
तूपात फॅटी अ‍ॅसिड असतात जे केसांच्या त्वचेला मऊ ठेवतात. तूप केसांसाठी नैसर्गिक कन्डीशनर म्हणून काम करते. 1 चमचा तूप घेऊन केसांची मालिश करा आणि 2 तासानंतर केस धुवून घ्या.

तूप त्वचेला मॉइश्चरायझर करते- तूप फक्त थोड्या प्रमाणात वापरुन आपण केसांच्या त्वचेला मॉइश्चरायझर करु शकता. यासाठी तूपाने केसांच्या त्वचेवर मालिश करा आणि काही मिनिटांनंतर धुवा.