बीड : बलात्कार प्रकरणी आरोपीस 7 वर्ष सक्तमजुरी

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – बीड तालुक्यातील हिंगळे खुर्द येथील महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपी सचिन वैजीनाथ तांदळे (रा. हिंगळे खुर्द) याला न्यायालयाने 7 वर्षाची सक्तमजुरी आणि साडेपाच हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. बीड जिल्हा सत्र न्यायाधीश -1एस. बी. कचरे यांनी ही शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास सहा महिन्याची अतिरीक्त शिक्षा सुनावण्यात आली.

पिडीत महिला 5 डिसेंबर 2016 रोजी सायंकाळी घरी एकटी असताना तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. पिडित महिलेने आरडा ओरडा केला मात्र, घराजवळील लोक यात्रेसाठी बाहेर गेले होते. याच संधीचा फायदा घेत आरोपीने महिलेवर अत्याचार केले. दरम्यान महिलेचा पती घरी आल्यानंतर त्याने आरोपीला रंगेहाथ पकडले. पतीने आरोपीला पकडण्याच प्रयत्न केला मात्र आरोपीने हाताला हिसका देत तेथून पळून गेला. नेकणुर पोलीस ठाण्यात आरोपी सचिन तांदळेविरुद्ध तक्रार दिली.

पीडीतेच्या फिर्यादीवरुन तत्कालीन पोलीस उप निरीक्षक जी. एस. वाघमारे यांनी गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास करुन जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले . सदर प्रकरणाची सुनावनी जिल्हा सत्र न्यायाधीश – 1 एस. बी. कचरे यांच्या न्यायालयात झाली. सरकारी पक्षातर्फे एकुण 8 साक्षीदार तपासण्यात आले. या प्रकरणात पिडित महिला, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार श्रीकांत तांदळे व साक्षीदार अशोक तांदळे यांचा पुरावा व इतर परिस्थितीजन्य पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले.

सहायक सरकारी वकील अनिल तिडके यांनी केलेला युक्तीवाद न्यायालयाने ग्राहय धरुन आरोपीला सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व पाचहजार पाचशे रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिण्याची अतिरीक्त शिक्षा सुनावली. त्यांना अ‍ॅड. बी. एफ. चव्हाण व पैरवी अधिकरी बिनवडे व पोलीस कॉन्सटेबल माने यांनी सहकार्य केले.

Visit : Policenama.com