Beed Crime | चक्क सासू-सासऱ्याने सुनेला भावाच्या मुलासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास पाडलं भाग; बीडमधील संतापजनक घटना

बीड न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  Beed Crime | बीड जिल्ह्यात नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. या घडलेल्या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. पोटच्या मुलाला मुल होणार नाही हे माहिती झाल्यानंतर, ‘वंशाला दिवा पाहिजे, ही मागणी करत, चक्क सासू-सासऱ्याने सुनेला (daughter-in-law) मारहाण करून, चक्क भावाच्या मुलासोबत (nephew) शारीरिक संबंध (Physical Relation) ठेवण्यास भाग पाडल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित महिलेनं पोलिसात (Beed Crime) फिर्याद दिली आहे.

अधिक माहिती अशी, ‘माझं लग्न गेल्या 15 वर्षांपूर्वी आष्टी तालुक्यातील (Ashti taluka) कडा परिसरात राहणाऱ्या मोठोबा भिसे (Motoba Bhise) यांच्याशी झालं आहे.
आम्ही नंदीबैलाच्या माध्यमातून भीक्षा मागून कुटुंबाकुटुंब चालवतो.
2016 मध्ये माझ्या पतीसह सासू-सासर्‍यांनी, मला न सांगता अहमदनगर येथील देशपांडे हॉस्पिटलमध्ये टेस्ट ट्यूब बेबी करून घेतली आणि मला मुलगी झाली.
परंतु, त्यानंतर 2020 मध्ये माझ्या सासूने मला सांगितले की, ‘तुझा नवरा बाप होऊ शकत नाही”.
मला यावर विश्वास बसला नाही, त्यामुळे मी माझ्या पतीला विचारून याची शहानिशा केली आणि त्यांनी देखील मला असच सांगितलं.
असं फिर्यादी पीडितेनं म्हटलं आहे.

 

पुढे या फिर्यादीत सांगितलं आहे की, त्यांनतर एक महिन्यानंतर माझे पती कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. याचाच फायदा घेऊन सासूने म्हटले की, “तुझा नवरा कधीच बाप बनू शकत नाही, म्हणून आपला वंश चालविण्यासाठी तुला एक मुलगा होणे गरजेचे आहे.
म्हणून मी जे सांगते ते ऐक व तसेच कर. “माझ्या भावाचा मुलगा देव यादव सोबत, तू शारीरिक संबंध ठेवून आम्हाला एक मुलगा दे, त्या गोष्टीला मी नकार दिला असता माझ्या सासू-सासर्‍यांनी मला खूप मारहाण केली. सततच्या मारहाणी पायी पीडितेने होकार दिला.
पीडितेला सासू-सासर्‍यांनी देव यादव (Dev Yadav) सोबत शारीरिक संबंध (Physical contact) ठेवण्यास भाग पाडले.

त्यांनतर काही दिवस वेळोवेळी यादवने पिडीतेसोबत जबरदस्ती देखील केले गेले.
दरम्यान, त्यानंतर काही दिवसांनी मी गरोदर (Pregnant) राहिल्याचे कळल्याने, ही गोष्ट मी माझ्या सासू सासर्‍यांसह नवर्‍याला सांगितली.
हे ऐकून त्यानंतर सासू-सासर्‍यांनी मला हॉस्पिटलमध्ये देखील घेऊन गेले आणि त्यांनी पेढे
देखील वाटप केले. मात्र, यादरम्यान माझ्या नवऱ्याला हे सर्व कळलं आणि त्यांनी माझ्या
भावाला बोलवून मला माहेरी पाठवलं, असं पीडितेने फिर्यादीत म्हटलं आहे.

 

या दरम्यान, पीडितेचा पती तिला नांदवत नसून या प्रकरणात आष्टी पोलीस ठाण्यात
(Ashti police station) गुन्हा देखील दाखल (FIR) झालाय.. मात्र पीडिता ही 5 महिन्यांची गरोदर (Pregnant) आहे. त्यामुळे तिच्यासमोर जगावं कसं हा प्रश्न निर्माण झाला आहे.
वंशाला दिवा पाहिजे म्हणून सासूसासऱ्यांनी हे कृत्य करण्यास भाग पाडलं.
ती गरोदर राहिल्यावर पेढे वाटले, अनेकांना दारू पाजली.
मात्र, आज पोटात असणाऱ्या बाळाला, बापाचं नाव काय द्यावं,
असा प्रश्न तिच्यासमोर निर्माण झालाय.

दरम्यान, या विषयी पीडितेचा भाऊ म्हणाला की, ‘2 तारखेला आम्ही तक्रार केलीय, आज 10 तारीख उलटलीय तरी एकाही आरोपीला पोलिसांनी अटक केली नाही.
आज समाज आम्हाला नाव ठेवतोय. तिचा नवरा तिला घरात घ्यायला तयार नाही.
ज्याने हे केलंय तो मुलगा देखील तिला घरात घ्यायला तयार नाही.
आणि असं असताना हे मिटवण्यासाठी समाजातील लोक पैसे घ्या म्हणतात.
आज या 5 महिन्याच्या गर्भाला नाव कुणाचा द्यावं? त्यामुळे समाज आणि
सरकारने आम्हाला न्याय द्यावा? अशी मागणी पीडितेच्या भावाने केलीय.
या दरम्यान, तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक राणी सानप (Sub-Inspector of Police Rani Sanap) यांनी सांगितलं आहे की, ‘आमचा तपास सुरू असून लवकरच आरोपींना आम्ही अटक करू असे त्या म्हणाल्या आहेत.

 

Web Title : Beed Crime | the daughter in law was forced to have Physical Relation with her nephew incident in beed of maharashtra

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Police Recruitment – 2019 | पोलीस भरती 2019 साठी अर्ज केलेल्या उमेदवारांना माहिती अपडेट करण्यासाठी मुदत वाढ

Pension Scheme | ‘या’ 4 सरकारी पेन्शन योजना घेतल्यास म्हातारपणात येणार नाही आर्थिक संकट, जाणून घ्या कसा घ्यावा लाभ

Anti Corruption Nashik | 8 लाखाच्या लाच प्रकरणात ZP च्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर-वीर फरार?