Beed Gharkul Yojana | डोक्यावरच्या छतासाठी प्रशासनाविरुद्ध लढतेय दोन जीवांची महिला; गुरुवारी पहाटे आंदोलनस्थळी दिला बाळाला जन्म

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – Beed Gharkul Yojana | बीड घरकुल योजनेतील (Beed Gharkul Yojana) मंजूर घरासाठी ग्रामपंचायत जागा देत नाही म्हणून गेल्या 10 दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (Collector’s Office) पारधी समाजातील एका गरोदर अवस्थेत असलेल्या महिलेचं (Pregnant Woman) आंदोलन (Agitation) सुरू आहे. या आंदोलनाची प्रशासकीय पातळीवर कोणतीही दखल घेण्यात आली नाही. दरम्यान, संबंधित महिलेने लढा सुरूच ठेवला. त्यातच गुरुवारी पहाटे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच त्यांनी बाळाला जन्म (Baby Born) दिला आहे. ही घटना समजताच पोलीस पथक (Police Squad) रुग्णवाहिका (Ambulance) घेऊन घटनास्थळी दाखल झाले. मात्र, महिलेच्या कुटूंबियांना शासनाची मदत नाकारली. इतकंच नाही तर व्यवस्थेवरचा आपला विश्वास उडाला असल्याचं सांगत लढा सुरूच ठेवला आहे.

 

मनीषा विकास काळे Manisha Vikas Kale (वय -23) असं बाळाला जन्म देणाऱ्या मातेचं नाव आहे. जिल्ह्यातील वासनवाडी शिवारात (Vasanwadi Shivar) अप्पाराव पवार राहतात. त्यांची पुतणी मनीषा विकास काळे याही पतीसमवेत त्यांच्याबरोबर राहतात. काही दिवसांपूर्वी पवार यांना घरकुल (Beed Gharkul Yojana) मंजूर झाले आहे. पण बांधकामासाठी ग्रामपंचायत (Gram Panchayat) जमीन उपलब्ध करून देत नव्हती. त्यामुळे 24 जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अप्पाराव हे आपल्या कुटुंबासह उपोषण (Hunger Strike) करत आहेत.

मनीषा काळे या गरोदर असतानाही त्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला.
दोन जीवांची महिला गेल्या दहा दिवसांपासून उपोषण करत असून देखील प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केलं आहे.
अशा अवस्थेत मनीषा यांनी गुरुवारी पहाटे आंदोलनस्थळीच बाळाला जन्म दिला आहे.
सकाळी 8 वाजता पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील (Shivaji Nagar Police Station) पोलीस रुग्णवाहिका घेऊन आंदोलनस्थळी आले.
त्यांनी बाळाला आणि मातेला रुग्णालयात घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. पण मनीषा यांच्या नातेवाईकांनी सरकारी उपचार नाकारले.

 

Web Title :- Beed Gharkul Yojana | pregnant woman gave birth to child while protesting from 10 days in front of Collector s Office beed

 

Advt.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा