बीडमध्ये जमिनीतून बाहेर पडतोय लाव्हासदृश्य पदार्थ ; फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – बीड येथे एका मोकळ्या मैदानात जमिनीखालून लाव्हासदृश्य पदार्थ बाहेर पडतो आहे. त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातवरण पसरले आहे. बीडमधील परळी तालुक्यातील सिरसाळा येथील मोकळ्या मैदानावर असा प्रकार पहायला मिळत आहे. यासंदर्भातले फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल नेट्वर्किंग साईट्स वर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. हा सगळा प्रकार नक्की काय आहे हे पाहण्यासाठी नागरिक याठिकाणी मोठी गर्दी करीत आहेत.

दरम्यान, याबाबत प्रशासनाला विचारले असता त्यांनी मात्र जमिनीतून येणारा पदार्थ लाव्हा आहे याला अद्याप पुष्टी दिलेली नाही. या भागात काल सायंकाळी जोरदार पाऊस झाला याच दरम्यान विजेची तार पडून हा सगळा प्रकार झाला असल्याचे संगितले जात आहे. असे असले तरी याठिकाणी जमिनीतून येणारा पदार्थ पाहण्यासाठी नागरिक गर्दी करीत आहेत. आता हा नेमका प्रकार काय आहे याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.