आश्चर्य ! बीडमधील महिला एकविसाव्यांदा होणार ‘बाळांतीण’

बीड : पोलिसनामा ऑनलाईन – काल जागतिक साक्षरता दिवस झाला. आपल्या भारतात आजदेखील मोठ्या प्रमाणात साक्षरतेची गरज आहे. महाराष्ट्रात देखील तीच परिस्थिती आहे. आज महाराष्ट्र भारतात सर्व पातळ्यांवर वरच्या क्रमांकावर आहे, मात्र साक्षरतेच्या बाबतीत आजदेखील खूप मागे आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला शिक्षणाची आणि प्रबोधनाची गरज आहे. साक्षर नसल्याचे एक जिवंत उदाहरण बीड जिल्ह्यात समोर आले असून या सगळ्या घटनांमध्ये लातूरचा क्रमांक हा दुसरा लागतो.

एकविसाव्यांदा महिला होणार बाळंत
साक्षर नसल्यामुळे बीडमधील एक महिला एकविसाव्यांदा बाळंत होणार आहे. बीडमधील एका गावात राहणारी ही महिला तिच्या एकविसाव्या बाळाला जन्म देणार आहे. लंकाबाई खरात असे या महिलेचे नाव असून या प्रकरणाची माहिती मिळताच या महिलेला सरकारी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. ही महिला सध्या 8 महिन्यांची गरोदर असून त्यांना याआधी नऊ मुली आणि दोन मुले अशी एकूण 11 अपत्ये आहेत. मात्र त्यांची त्याआधीची बाळंतपणे घरीच सुरक्षित झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

लातूरमध्ये देखील 10-12 बाळंपतपणं
असे प्रकार केवळ बीडमध्येच घडत नसून लातूरमध्ये देखील अशाप्रकारे एक महिला 10-12 वेळा गर्भवती राहण्याचे प्रकार घडत आहे. त्यामुळे या सर्व प्रकारांकडे शासनाने गांभीर्याने बघून या प्रकरणी समुपदेशन करण्याची गरज आहे.