दिवाळीपूर्वी 95 पथविक्रेता यांना प्रत्येकी 10 हजाराचे कर्ज वाटप

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन – जेजुरी नगरपरिषदेच्या वतीने शासनाची प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना राबविली जात आहे. कोरोना लॉकडाउन काळामध्ये नोंदणीकृत हातगाडीवाले, फेरीवाले, भाजीविक्रेते यांना शासनाच्या प्रधानमंत्री पथविक्रेता योजनेअंर्तगत जेजुरी शहरातील बँक ऑफ बरोडा, बँक ऑफ महाराष्ट्र तसेच भारतीय स्टेट बँक यांच्या माध्यमातून फेरीवाले, भाजी विक्रेते यांना भागभांडवल म्हणून प्रत्येकी 10 हजार रुपये सूक्ष्म कर्ज पुरवठा करण्यात आला आहे.

आजपर्यंत 301 लाभार्थी यांनी ऑनलाईन अर्ज भरलेले आहेत त्यापैकी 147 पथविक्रेत्यांचे कर्ज मंजूर झालेले आहे व एकूण 95 लाभार्थी यांना सूक्ष्म कर्ज पुरवठा करण्यात आलेला आहे. या रक्कमेची एक वर्षांमध्ये योग्य प्रकारे व वेळेत परतफेड केल्यास पुन्हा जास्त कर्ज स्वरूपात भांडवल उपलब्ध होऊ शकते तसेच डिजिटल पेमेंट वर 1200 रुपये चा लाभ मिळणार आहे.सर्व व्यवसायिक फेरीवाले, पथारिवाले यांनी आर्थिक व्यवहार हा मोबाइल बैंकिंग, गूगल पे, फोनपे, अशा डिजिटल माध्यमातूनच करावा असे मुख्याधिकारी पूनम कदम यांनी सांगितले.जेजुरी नगरपरिषद मध्ये या योजनेसाठी प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर समिती गठीत करण्यात आलेली आहे तसेच या योजनेची अंमलबजावणी जेजुरी नगरपरिषद NULM अभियान व्यवस्थापक कक्ष, शहर फेरीवाला समिती करीत आहेत.

ज्या नोंदणीकृत लाभार्थी यांनी कर्ज मागणीसाठी ऑनलाईन अर्ज भरलेले नाहीत त्यांनी तात्काळ जेजुरी शहरातील CSC सेंटर येथे अर्ज करावेत व या योजनेचा लाभ घ्यावा असे नगराध्यक्षा विना सोनवणे यांनी पथविक्रेता यांना आवाहन केले. तसेच शहरातील सर्व व्यवसायिक, फेरीवाले, भाजी विक्रेते, पथारिवाले यांनी प्लॅस्टिकचा वापर करू नये तसेच स्वच्छ शहर ठेवणेबाबत सर्वानी सहकार्य करावे. अशाही सुचना देण्यात आल्या.