राज ठाकरेंनी भाषणाच्या सुरूवातीत केला ‘चेंज’, म्हणाले – ‘जमलेल्या माझ्या तमाम…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आज मनसेच्या कार्यकर्त्यांचे अधिवेशन मुंबईत पार पडले. यावेळी पक्षांचा झेंडा लॉन्च करण्यात आला. त्यानंतर संध्याकाळी राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांनी संवाद साधला. राज ठाकरेंनी ‘माझ्या तमाम हिंदू बांधवांनो’ असे म्हणत भाषणाला सुरुवात केली आणि पक्षांचा नवा झेंडा आवडला का असे कार्यकर्त्यांना विचारले.

मनसेने आपल्या पहिल्या आधिवेशनात राज ठाकरे यांच्या हस्ते शिवरायांची राजमुद्रा असलेल्या पक्षाच्या ध्वजाचे अनावरण केले. यावरुनच मनसेची पुढील वाटचाल स्पष्ट झाली. यावरुन आता मनसेचा अजेंडा फिस्क आहे की अंगावर याल तर शिंगावर घेऊ. कारण तसे संकेत खुद्द राज ठाकरेंनी दिले. राज ठाकरे म्हणाले की मराठीचे काय, हिंदुत्वाचे काय – तर हे लक्षात ठेवा, मी मराठी देखील आहे आणि हिंदु देखील आहे. मी धर्मांतर केलं नाही. हे मी आज नाही याआधीही सांगितलं आहे. त्यामुळे आज पुन्हा सांगतो, माझ्या मराठीला हात लावण्याचा प्रयत्न केला तर मी मराठी म्हणून आंगावर जाईल. आणि धर्माकडे बोट केलं तर हिंदू म्हणून अंगावर जाईल. त्याबाबत माझे विचार स्पष्ट आहेत.

राज ठाकरेंनी भाषणाची सुरुवात करताना म्हणले की जमलेल्या माझ्या हिंदू बांधवानो-भगिनींनो आणि मातांनो. यावरुन त्यांच्या पक्षाच्या पुढील अजेंड्याचे बदलले संकेत मिळाले. ज्याप्रमाणे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आपल्या भाषणांची सुरुवात करायचे तेव्हा, असेच म्हणायचे, त्याची आठवण राज ठाकरेंच्या भाषणातून आज झाली. त्यामुळे राज ठाकरेंचे हिंदवी स्वराज्य हे बाळासाहेबांच्या संघटनेप्रमाणेच चालणार असे संकेत मिळेल.

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like