मान्सूनच्या परतीला सुरुवात ! मुंबईतही लवकरच Send Off !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राजस्थानच्या पश्चिम भागातून मान्सूननं परतीचा प्रवास सुरू केला आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत सरासरीच्या तुलनेत 17 टक्के अधिकच्या पावसाची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात 4 महिन्यात मान्सूनची 995.3 मिमी नोंद होत असते. परंतु यावर्षी मात्र 1163.5 मिमी एवढा पाऊस कोसळला असल्याची नोंद करण्यात आली आहे. अधिकच्या पावसानं महाराष्ट्रातील काही जिल्हे वगळता उर्वरीत राज्यात मान्सूननं बऱ्यापैकी सरासरी ओलांडली आहे अस दिसतंय.

भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 17 सप्टेंबरच्या आसपास मान्सून राजस्थानातून आपला परतीचा प्रवास सुरू करतो. परंतु यावर्षी तब्बल 11 दिवस विलंबानं मान्सूननं आपल्या परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. येत्या 48 तासात मान्सून हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशमधून परतीचा प्रवास सुरू करेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. यानंतर मान्सूनच्या परतीचा प्रवास महाराष्ट्रातून सुरू होण्यास काही दिवसांचा अवधी शिल्लक राहणार आहे. मुंबईतदेखील मान्सूला गुडबाय करण्याची वेळ आली आहे. आता तिथं परतीच्या पावसाचं वातावरण तयार होईल असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.

विभागनिहाय अधिक पाऊस टक्क्यांमध्ये –

कोकण गोवा – 28
मध्य महाराष्ट्र – 30
मराठवाडा – 31
विदर्भ – 10 टक्के तूट

जिल्हानिहाय अधिक पाऊस टक्क्यांमध्ये –

मुंबई शहर – 23
मुंबई उपनगर -93
ठाणे – 24
रायगड – 11
रत्नागिरी – 11
सिंधुदुर्ग -145
कोल्हापूर – 47
सांगली – 60
सातारा – 30
पुणे – 47
नाशिक – 30
नंदुरबार – 16
धुळे – 55
औरंगाबाद – 38
अहमदनगर – 102
उस्मानाबाद – 50
लातूर – 83
बीड – 51
परभणी – 76
जालना – 47
जळगाव – 29
बुलडाणा – 14
वाशिम – 41
हिंगोली – 35
नांदेड – 45

तूट : जिल्हानिहाय पाऊस टक्क्यांमध्ये –

सोलापूर – 5
अकोला – 25
अमरावती -15
यवतमाळ – 4
वर्धा -5
नागपूर – 25
चंद्रपूर – 47
भंडारा – 70
गोंदिया – 59
गडचिरोली – 21
पालघर – 30

मान्सूनच्या परतीच्या तारखा (ऑक्टोबर) –

जळगाव – 6
नागपूर – 6
मुंबई – 8
अहमदनगर – 8
सातारा – 9
कोल्हापूर – 11
पुणे – 11