अवघ्या 12 सेकंदात उद्धवस्त झाले शहर ! पाहा व्हिडीओ

पोलिसनामा ऑनलाईन टीम – लेबननची राजधानी बैरुतमध्ये काल सायंकाळी एका मोठा स्फोट झाला. स्फोटाची भीषणता इतकी होती की, तब्बल 10 मैलपर्यंतचा परिसर हादरला होता, जहाजमध्ये असलेल्या फटाक्यांचा स्फोट झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटामुळे रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्यात तीन मजल्यांपर्यंतवर उडाल्या. स्फोटात आतापर्यंत 73 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 4000 लोक जखमी झाले आहेत. लेबननचे पंतप्रधान हसन डायब यांनी बुधवारी राष्ट्रीय शोक दिन जाहीर केला आहे.

राष्ट्रपती मायकेल इऑन यांनी ट्विट केले आहे की 2,750 टन स्फोटक नायट्रेट असुरक्षित पद्धतीने साठवले गेले होते. हा स्फोट कसा झाला याचा तपास सुरू आहे. या स्फोटाचा भयंकर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, यात लोकांचे मृतदेह रस्त्यावर विखुरलेले दिसत आहे.
सेंट्रल बैरूतमध्ये काल संध्याकाळी दोन मोठे स्फोट झाले.

लेबननमध्ये असणार्‍या भारतीयांसाठी भारतीय दूतावासाने मदतीचे फोन क्रमांक दिले आहेत. या परिस्थितीत सगळ्यांनी शांत राहण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. बैरूतमध्ये झालेला स्फोट नायट्रेटमुळे झाला असावा असे सांगण्यात आले आहे. या गोदामात 2014 पासून एक स्फोटक स्टोअर असल्याचे सांगितले जात आहे.