बेलापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या मंदा म्हात्रे विजयी

बेलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – बेलापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या मंदा म्हात्रे 43 हजार 597 मतांनी विजयी झाल्या आहेत. नाईक कुटुंबीय भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर नवी मुंबईत जागा वाटपाचा तिढा निर्माण झाला होता.

राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देवून महापालिकेतील 52 नगरसेवकांसह भाजपामध्ये दाखल झालेले माजी मंत्री गणेश नाईक यांना बेलापूर मतदार संघातून भाजपाने तिकिट नाकारत पक्षाने पुन्हा मंदा म्हात्रे यांना संधी दिली होती. मंदा मंत्रेंविरोधात राष्ट्रवादीने अशोक गावडे यांना उमेदवारी दिली होती.
ऐनवेळी दोन्ही मतदार संघ भाजपला मिळाल्याने शिवसेनेच्या गोटात नाराजी पसरली होती. बेलापूरमधून गणेश नाईक यांना उमेदवारी दिल्यास प्रचार करणार नाही, असा पवित्रा शिवसैनिकांनी घेतला होता.

बेलापूर विधानसभा मतदारसंघ

1 मंदा विजय म्हात्रे (भाजप) 87858 (विजयी उमेदवार )
2 अशोक अंकुश गावडे (काँग्रेस) 44261
3 गजानन श्रीकृष्ण काले (मनसे ) 27618
4 आव्हाड सचिन भारत (बहुजन समाज पार्टी) 1556
5 डॉ. अजयकुमार उपाध्याय युवा जनकल्याण पार्टी 452
6 आप्पासाहेब विष्णू क्षिरसागर रिपब्लिकन बहुजन सेना 477
7 भानुदास धोतरे (सातारकर) राष्ट्रीय राष्ट्रवादी पार्टी 104
8 हरजीत सिंघ कुमार इंडियन नेशनल परिवर्तन पार्टी 259
9 आहुजा उमा (अपक्ष ) 485
10 किरन अरुन वाघमारे (अपक्ष ) 278
11 गौतम दुर्योधन गायकवाड (अपक्ष ) 3031
12 चंद्रशेखर जनार्दन रानडे (अपक्ष ) 2648
13 भागवत जीतन शर्मा (अपक्ष ) 270
14 मुकेश ठाकुर (अपक्ष ) 228
15 विजय जगन्नाथ माने (अपक्ष ) 230
16 शांताराम कुकरा शेट्टी (अपक्ष ) 510
17 संतोष र. कांबले (अपक्ष ) 458
18 NOTA 3804

Visit : Policenama.com