कढीपत्त्याच्या सेवनाने ‘हे’ आजार येतील आटोक्यात ; घ्या जाणून

पोलिसनामा ऑनलाईन टीम – आपल्याकडे कढीपत्त्याचा वापर हा फक्त फोडणीमध्येच करण्यात येतो. फोडणीमध्ये आणि पदार्थात कढीपत्त्याचा वापर केल्यामुळे पदार्थंची चव वाढतेच परंतु त्याचे अनेक आरोग्यविषयक फायदे आहेत. परंतु आपण जेवण करताना भाजीतला कढीपत्ता हा बाजूला काढून टाकतो. पण या बाजूला काढण्यात येणाऱ्या कढीपत्त्याचे अनेक फायदे आहेत. ते आपण आज जाणून घेणार आहोत.

१) सर्दी-कफ
जर तुम्हांला साइनस किंवा कफचा त्रास असेल तर कढीपत्याचा वापर पदार्थामध्ये वाढवणे गरजेचे आहे. तर कढीपत्त्यामधील व्हिटॅमिन सी, अँटी-इन्फ्लैमटोरी आणि अँटी-ऑक्सिडेंट हे गुण कफ साचू देत नाही.

२) केमोथेरेपीच्या साइड इफेक्टला कमी करते
काही संशोधनानुसार असे पुढे आले आहे की, कढीपत्त्यामध्ये एवढी क्षमता असते की ते केमोथेरेपी आणि रेडियोथेरेपीमुळे शरीराला होणारे नुकसान कमी करण्यास मदत करते.

३) इन्फेक्शनपासून बचाव
कढीपत्त्याचे अँटी-ऑक्सिडेंट, अँटी बॅक्टेरीयल, व अँटी-फंगल गुण फंगल इन्फेक्शन, मुरमे यापासून बचाव करतात.

४) ऍनिमियची समस्या
कढीपत्यामध्ये आयर्न आणि फॉलिक ऍसिडचा स्रोत असतो. त्यामुळे याचे सेवन केल्याने ऍनिमियाची समस्या दूर होते.

५) केसांचे आरोग्य
केसांच्या आरोग्यासाठी आहारात कढीपत्याचा समावेश हा अत्यंत उपयुक्त ठरतो. कढीपत्याच्या सेवनामुळे केसाचे आरोग्य सुधारते. केसांचा पोत सुधारतो तसेच केस काळे राहण्यास मदत होते.

आरोग्यविषयक वृत्त