तृणमूलच्या युवा नेत्याची गोळ्या झाडून हत्या

कोलकता : वृत्तसंस्था – पश्चिम बंगाल मधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बेहरामपुर येथे राहणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या युवा नेत्याची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. सोमवारी २५ फेब्रुवारी २०१९ ला सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. काही बाइकस्वारांनी अचानक येऊन या नेत्याची गोळ्या घालून हत्या केली आहे . नजीमुल शेख असे या तृणमूलच्या युवा नेत्याचे नाव होते.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, “शेख ज्या भागात राहत होता त्याच भागात त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. त्याच्यावर गोळीबार झाल्यानंतर लगेचच मुर्शिदाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आपण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित करण्यात आले. या प्रकरणाबाबत पोलिसांनी सांगितले की ” शेख याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. एवढेच नाही तर त्याला काही महिन्यांकरिता तुरुंगात पाठवण्यात आले होते. तो तृणमूल काँग्रेसचा नेता होता”. त्याच्यावर गोळीबार कोणत्या कारणावरून करण्यात आला ? तो कोणी केला ? याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत.