दारुसाठी पैसे न दिल्याने मुलाने आईला पेट्रोल टाकून पेटवले

बेंगळुरु: वृत्तसंस्था – एकदा का एखाद्या व्यक्तीला नशा करण्याचे व्यसन लागले की मग ते व्यसन मरेपर्यंत त्याची पाठ सोडत नाही. काही करून त्याला ती नशा करायचीच असते. व्यसनाधीन माणसाला नशा करण्यासाठी जर कसली अडचण आली तर मात्र त्याचा जीव कासावीस आणि यासाठी तो काहीही करू शकतो. कारण नशा करण्यास न भेटल्याने त्याचा जीव कासावीस होतो.

त्याला परिणामी तो त्यासाठी काहीही करू शकतो. अशी माणसे एखाद्याचा जीव घ्यायलाही कमी करत नाहीत. अशीच काहीशी घटना समोर आली आहे. 20 वर्षाच्या एका तरुणाने दारूसाठी आईकडे पैशांची मागणी केली. आईने पैसे देण्यास नकार दिला हे पाहून त्या युवकाने आपल्या आईलाच पेटवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कर्नाटकची राजधानी बेंगळुरु येथून ही लाजीरवाणी घटना समोर आली आहे.

https://twitter.com/ANI/status/1071782973794648064

उत्तम कुमार असे या आरोपी युवकाचे नाव आहे. दरम्यान गंभीर जखमी असलेल्या आईला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोपी उत्तम कुमार पसार झाल्याचे समजत आहे. सदर घटनेची पोलिसांत नोंद झाली असून उत्तम कुमारचा शोध घेतला जात आहे. दारुसाठी आईलाच पेटवून दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.

नेमकी  घटना काय?
बेंगळुरु येथील सदाशिवनगर परिसरातील ही घटना आहे. 20 वर्षीय उत्तम कुमार याने आपल्या आईकडे दारूसाठी पैसे मागितले. परंतु आईने त्याला पैसे देण्यास नकार दिला. यानंतर आरोपी युवकाचा आणि आईचा पैशांवरून प्रचंड वाद झाला. दारू पिण्यास पैसे देण्यास आईने दिलेला नकार पाहून संशयित आरोपी उत्तम कुमार संतप्त झाला. त्यामुळे चिडलेल्या उत्तम कुमारने आईवर पेट्रोल टाकले आणि पेटवून दिले. जखमी अवस्थेत असलेल्या आईला त्याच्या वडिलांनी रुग्णालयात दाखल केले. या घटनेत आईचा चेहरा, हात आणि छातीला गंभीर दुखापत झाली आहे.  ६ डिसेंबर रोजी ही घटना घडली होती.

बेंगळुरु येथे आईवर हल्ला केल्याची अशीच घटना याआधीही समोर आली होती. आईने आपल्या मुलाला शेजाऱ्यांच्यासमोर रागावले.  शेजाऱ्यांच्यासमोर रागावल्यामुळे चिडून एका व्यक्तीने आपल्या आईला झाडूने मारहाण केली होती. या घटनेचा व्हिडीआेदेखील प्रचंड व्हायरल झाला होता.