‘कोरोना’ कालावधीत ‘या’ 3 अब्जाधीशांनी केली जबरदस्त कमाई, यावर्षी संपत्तीत 8.6 लाख कोटींची वाढ

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –  कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे, याचा परिणाम जगातील बहुतेक लोकसंख्या आणि व्यवसायावर झाला आहे, परंतु यादरम्यान अशी काही अब्जाधीश आहेत, ज्यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यतकी आणि अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस, फेसबुक संस्थापक मार्क झुकरबर्ग आणि इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे संस्थापक एलोन मस्क यांची संपत्ती वाढली आहे. यावर्षी बेझोस, झुकरबर्ग आणि मस्क यांच्या एकूण संपत्तीत 8.6 लाख कोटी रुपये म्हणजेच 115 अब्ज डॉलर्सची कमाई झाली आहे.

ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सच्या मते, अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांच्या संपत्तीत यावर्षी सर्वाधिक वाढ झाली आहे. कोरोना व्हायरसमुळे ऑनलाइन शॉपिंगचा ट्रेंड वाढल्यामुळे बेझोसची संपत्ती प्रचंड वाढली आहे. एका दिवसात अ‍ॅमेझॉनचेच्या प्रमुख बेझोसची एकूण संपत्ती 97,500 कोटींनी (13 अब्ज डॉलर्स) वाढली आहे. अशा प्रकारे, बेझोसची एकूण संपत्ती 200 अब्ज डॉलरपेक्षा जास्त झाली आहे.

फेसबुक संस्थापक मार्क झुकरबर्गचीही संपत्ती वाढली आहे. यावर्षी झुकरबर्गची संपत्ती 68,250 कोटी रुपये म्हणजेच 9.1 अब्ज डॉलर्सने वाढली आहे. त्याच वेळी मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्सची संपत्ती 4.08 अब्ज डॉलर्सने वाढली आहे. तसेच या काळात टेस्लाचे संस्थापक एलोन मस्क यांच्या संपत्तीत 3.15 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. टेस्ला शेअर्सच्या वाढीमुळे मस्कला फायदा झाला. दरम्यान, टोयोटाला नमवून टेस्ला जगातील सर्वात मूल्यवान वाहन कंपनी बनली आहे. टेस्ला इलेक्ट्रिक कार बनवते.

टॉप 10 मध्ये 7 तंत्रज्ञान क्षेत्रातील

दरम्यान, जगातील 10 सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी 7 तंत्रज्ञान क्षेत्रातील असून त्यांची एकूण मालमत्ता 49.95 लाख कोटी रुपये म्हणजेच 666 अब्ज डॉलर्स आहे. यावर्षी त्यांची एकूण मालमत्ता 11 लाख कोटी रुपयांनी म्हणजेच 147 अब्ज डॉलर्सने वाढली आहे.