Bhandara Accident News | ट्रेलरचे चाक पोटावरून गेल्याने पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू, भंडरा शहरातील घटना

भंडारा : पोलीसनामा ऑनलाइन – Bhandara Accident News | भाजी घेऊन आपल्या दुचाकीवरुन घरी जात असताना भरधाव वेगात आलेल्या ट्रेलरने चिरडल्याने पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू (Policeman Died) झाला. ही धक्कादायक घटना (Bhandara Accident News) भंडारा शहरातील त्रिमूर्ती चौकात घडली. ट्रेलचे चाक पोलीस कर्मचाऱ्याच्या पोटावरुन गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. भंडारा शहरात 24 तासात झालेला हा दुसरा अपघात असून शहरातील वाहतूक व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
राजपुत मते ASI Rajput Mate (वय-56) असे मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. मते हे भंडारा शहरातील पोलीस लाईनमध्ये राहत होते. ते लाखनी पोलीस ठाण्यात (Lakhni Police Station) सहायक पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत होते. मार्केटमधून भाजी घेऊन पोलीस लाईन येथे घरी जात असताना त्यांचा अपघाती दुर्दैवी (Bhandara Accident News) मृत्यू झाला. या घटनेमुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.
राजपूत मते हे दुचाकीवरून जात असताना भरधाव वेगात येणाऱ्या ट्रेलरची धडक (Trailer) त्यांच्या दुचाकीला बसली.
ही धडक एवढी जबर होती की मते हे चाकाखाली सापडले. त्यांच्या पोटावरुन ट्रेलरचे चाक गेल्याने यात गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेनंतर चौकामध्ये असलेल्या पोलिसांनी ट्रेलर चालकाला ताब्यात घेतले आहे.
मयत राजपूत मते यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी आई, पत्नी असा परिवार आहे.
Web Title :- Bhandara Accident News | police officer died in accident in bhandara city in accident
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Crime News | वानवडी गावात टोळक्याचा धुडगूस; वाहनांवर दगडफेक करुन केली नासधुस
Dhule Accident News | अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दोन जिवलग मित्रांचा दुर्दैवी अंत