एल्गार परिषद : विचारवंत गौतम नवलखा यांना २६ जून पर्यंत अटकेपासून ‘दिलासा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – एल्गार परिषद, भीमा कोरेगाव हिंसाचार आणि माओवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप असलेले विचारवंत गौतम नवलखा यांना उच्च न्यायालयाने २६ जूनपर्यंत अटकेपासून संरक्षण देत दिलासा दिला आहे. याआधी झालेल्या सुनावणीत त्यांच्याविरोधातील आरोपांसदर्भात पुणे पोलिसांनी दाखल केलेल्या कागदपत्रांमध्ये काहीही आक्षेपार्ह वाटत नाही. असं महत्त्वाचे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले होतं.

गौतम नवलखा यांच्या विरोधात माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपांवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये त्यांनी देशाविरुध्द युद्ध पुकारल्याच्या आरोपासह अनेक गंभीर आरोप त्यांच्यावर कऱण्यात आले आहेत. त्यांच्याविरोधातील गुन्हा रद्द करण्यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

आरोपपत्र दाखल केल्यानंतरच पुरावे दाखविण्यात येतील
गौतम नवलखा यांच्या विरोधात राज्य सरकारने दाखल केलेली कागदपत्रे आणि पुरावे त्यांना आरोपपत्र दाखल केल्यानंतरच दाखविण्यात येतील. याची माहिती बाहेर आल्यास आरोपीला त्याचा फायदा होईल असा युक्तीवाद असा युक्तीवाद सरकारी वकिल अरुणा पै यांनी केला. २६ जून रोजी होणाऱ्या सुनावणीत ही कागदपत्रं न्यायालयात सादर केली करून त्यावर युक्तीवाद केला जाईल. असे उच्च न्यायालयाने सांगितले.