३५ वर्षीय बॉडीबिल्डरचा आकस्मात मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अवघ्या ३५ वर्षीय शरीरसौष्ठवपटूचा आकस्मात मृत्यू झाला आहे. रवी सावंत असे या तरुणाचे नाव आहे. त्याचा हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाला आहे. त्याच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी परिसरात असंख्य स्पर्धा जिंकून रवी सावंत यांनी नाव कमावलं होतं. नुकतंच उरणमध्ये महाराष्ट्र राज्य हौशी शरीरसौष्ठव संघटनेने आयोजित केलेल्या स्पर्धेत त्यांनी तिसऱ्या गटात सुवर्णपदक पटकावलं होतं. त्यामुळे सावंत यांची निवड ‘भारत श्री’ स्पर्धेसाठी झाली होती. रवी सावंत यांनी पाच दिवसांपूर्वीच ‘भिवंडी श्री’चा किताब पटकावला होता. रवी सावंत यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि आई-वडील असा परिवार आहे. त्यांच्या अकस्मात मृत्यूने शरीरसौष्ठव क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. काल संध्याकाळी त्यांच्यावर साश्रू नयनाने अंत्यसंस्कार करण्यात आले.

‘..तर पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांच्या घरासमोर कला सादर करू’

आर्थिक वादातून दिली कंपनी जाळण्याची सुपारी