Bhiwandi Crime | कामाच्या वादातून सहकाऱ्यानेच चिरला 18 वर्षीय तरुणाचा गळा

भिवंडी : पोलीसनामा ऑनलाइन  –  Bhiwandi Crime | वळ ग्रामपंचायत हद्दीतील पेपर गोदामात कामाच्या वादातून २१ वर्षीय सहकाऱ्याने १८ वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून केला. राजू क्यातम असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर मोहम्मद असिफ अन्सारी असे हत्या करून फरार झालेल्याचे नाव आहे. दिवाळीची धामधूम सुरू असताना ही घटना घडल्याने परिसरात खळबळ (Bhiwandi Crime) उडाली आहे.

 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वळ ग्रामपंचायत हद्दीतील कृष्णा कॉम्प्लेक्स या गोदाम संकुलात राजू आणि मोहम्मद हे दोघे लेमिनेशन पेपरचे काम करत होते. महिन्याभरापूर्वी दोघांमध्ये कोण काम चांगले करत यावरून वाद झाला होता. या वादाचा राग मनात धरून मोहम्मदने कटरने राजुचा गळा चिरला. त्यानंतर मोहम्मद घटनास्थळावरून फरार झाला. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून मुतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात हलविला आहे. दरम्यान आरोपीचा पोलीस शोध घेत (Bhiwandi Crime) आहेत.

 

Web Title : Bhiwandi Crime | murder of a friend by a colleague in a paper mill incident in bhiwandi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Live-in Relationship | केवळ ‘लिव्ह इन’ रिलेशनशिपमध्ये राहिल्याने मिळत नाहीत वैवाहिक अधिकार, हायकोर्टाने म्हटले…

Pune Crime | ‘जडीबुटी’ औषध निर्मिती करणाऱ्या मुलाकडून जन्मदात्या पित्याचा निर्घृण खून

Post office च्या ‘या’ स्कीममध्ये पैसे होतील दुप्पट, मॅच्युरिटीवर मिळतील 2 लाखाचे 4 लाख रुपये

Nawab Malik | ‘भाजपला जितक्या वेळा पराभूत कराल, तितकी महागाई कमी होईल’ (व्हिडीओ)

Anil Deshmukh | 100 कोटी वसुली प्रकरण : वसुलीची रक्कम हवालामार्फत देशमुख यांच्या निकटवर्तीयांच्या विविध 27 कंपन्या वळवल्याचा ED ला संशय