Pune Crime | ‘जडीबुटी’ औषध निर्मिती करणाऱ्या मुलाकडून जन्मदात्या पित्याचा निर्घृण खून

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Crime | जडीपुटी औषध निर्मिती करणाऱ्या (manufactures herbal medicine) मुलाने आपल्या जन्मदात्या पित्याचा निर्घृण खून केल्याची घटना पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) दौंड (Daund) तालुक्यातील पारगाव (Pargaon) येथे घडली आहे. ही घटना मंगळवारी (दि.2) मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. पारगाव येथील मुख्य चौकामध्ये जडीबुटी निर्मिती करणारे कुटुंब राहत होते.

 

मागील अनेक वर्षापासून पारगावच्या मुख्य चौकात हे कुटुंब जडीबुटी विकण्याचा व्यवसाय करत होते.
मयत रतनसिंग नरसिंह चितोडिया Ratan Singh Nursingh Chitodia (वय-69 रा. पारगाव ता. दौंड) यांनी आपला मुलगा अजय रतनसिह चितोडिया
Ajay Ratan Singh Chitodia (वय-40 रा. पारगाव) याच्याकडे पैशांची मागणी केली. मात्र, मुलाने पैसे देण्यास नकार दिला.

 

दोघेही दारुच्या नशेत असल्याने वडिलांनी मुलाला किरकोळ मारहाण (Pune Crime) केली.
त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास मुलाने वडिलांना लाकडाच्या दांडक्याने मारहाण केली.
यामध्ये गंभीर जखमी होऊन वडिलांचा जागीच मृत्यू (Death) झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नारायण पवार (Inspector of Police Narayan Pawar), पोलीस उपनिरीक्षक पद्मराज गंपले (PSI Padmaraj Gample) यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | murder of father by son who manufactures herbal medicine

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Post office च्या ‘या’ स्कीममध्ये पैसे होतील दुप्पट, मॅच्युरिटीवर मिळतील 2 लाखाचे 4 लाख रुपये

Nawab Malik | ‘भाजपला जितक्या वेळा पराभूत कराल, तितकी महागाई कमी होईल’ (व्हिडीओ)

Diwali 2021 | दिवाळीत ग्रहांचा शुभयोग ! 4 राशीच्या जातकांना होईल ‘लाभ’, लक्ष्मीमातेची राहील विशेष कृपा