Post office च्या ‘या’ स्कीममध्ये पैसे होतील दुप्पट, मॅच्युरिटीवर मिळतील 2 लाखाचे 4 लाख रुपये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Post office | इन्व्हेस्टमेंट करणे (Investment planning) एक चांगली सवय असते. कारण वाईट काळात नेहमी आपली बचतच उपयोगी पडते. परंतु प्रत्येकजण याच संभ्रमात असतो की, गुंतवणूक कुठे करावी, जिथे पैसे सुरक्षित राहतील आणि रिटर्नही चांगला मिळेल. आम्ही तुम्हाला अशा योजनेबाबत सांगणार आहोत, जिथे पैसे सुरक्षित राहतील आणि मॅच्युरिटीवर दुप्पट रिटर्न मिळेल. ही पोस्ट ऑफिस (Post Office) ची किसान विकासपत्र (Kisan Vikas Patra KVP) योजना आहे.

 

किसान विकास पत्र (kisan vikas patra) भारत सरकारची वन टाइम इन्व्हेस्टमेंट स्कीम आहे. येथे ठराविक कालावधीत पैसे दुप्पट होतात.
किसान विकास पत्र देशातील सर्व पोस्ट ऑफिसमध्ये (Post office) आणि मोठ्या बँकेत उपलब्ध आहेत.
केव्हीपी भारत सरकारद्वारे जारी एक वन टाइम इन्व्हेस्टमेंट स्कीम आहे, जेथे ठरलेल्या कालावधीत तुमचे पैसे दुप्पट होतात.
याचा मॅच्युरिटी पीरियड सध्या 124 महीने आहे. यामध्ये किमान गुंतवणूक 1,000 रुपयांची करता येते. कमाल गुंतवणुकीसाठी कोणतीही मर्यादा नाही.

 

कोण करू शकतात गुंतवणूक

 

किसान विकास पत्रात गुंतवणूक करणार्‍याचे वय किमान 18 वर्षे असणे जरूरी आहे. यामध्ये सिंगल अकाऊंटशिवाय जॉईंट अकाऊंटसुद्धा काढू शकता. ही योजना अल्पवयीनांसाठी सुद्धा आहे. ज्याची देखरेख पालकांना करावी लागते. ही योजना हिंदू विभक्त कुटुंबांना वगळून ट्रस्टसाठी सुद्धा लागू आहे.

 

व्याजदर

 

पोस्ट ऑफिसच्या स्कीममध्ये वार्षिक 6.9 टक्केच्या दराने व्याज मिळते. हे व्याजदर 1 एप्रिल 2020 पासून लागू आहेत.
या स्कीममध्ये गुंतवणूक केल्यावर तुमचे पैसे 124 महिन्यात (10 वर्षे आणि 4 महिने) डबल होतील. उदाहरणार्थ तुम्ही या योजनेत 1 लाख रुपयांची गुंतवणूक केलीत.
तर 124 महिन्यानंतर तुम्हाला 2 लाख रुपये मिळतील.

 

ट्रान्सफर करण्याची सुद्धा सुविधा

 

किसान विकास पत्र जारी करण्याच्या तारखेच्या अडीच वर्षानंतर पूर्तता केली जाऊ शकते.
केव्हीपी एका पोस्ट ऑफिसमधून दुसर्‍या पोस्ट ऑफिसमध्ये (Post office) सुद्धा स्थलांतरित करता येते.
किसान विकास पत्र एक व्यक्ती दुसर्‍या व्यक्तीला हस्तांतरीत करू शकते. केव्हीपीमध्ये नॉमिनेशनची सुविधा उपलब्ध आहे.
किसान विकास पत्र पासबुकच्या आकारात जारी करण्यात येते.

 

असे उघडा खाते

 

यासाठी जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन फॉर्म भरून खाते उघडू शकता. याशिवाय फॉर्म ऑनलाइन सुद्धा डाऊनलोड करता येतो.
फॉर्मवर पूर्ण नाव, जन्म तारीख आणि व्यक्तीचा पत्ता लिहावा लागेल. फॉर्ममध्ये पर्चेस अमाऊंटची मात्रा स्पष्ट लिहावी.
केव्हीपी फॉर्मची रक्कम रोख किंवा चेकने भरता येते. चेकने पैसे भरल्यास, फॉर्मवर चेकनंबरची माहिती लिहा.

 

या कागदपत्रांची आहे गरज

 

या योजनेत गुंतवणुक करण्यासाठी आधार कार्ड, पॅनकार्ड, वोटर आयडी कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, घतझ अर्ज, अ‍ॅड्रेस प्रूफ आणि बर्थ सर्टिफिकेटची आवश्यकता असते. (Post office)

 

Web Title : Post Office | post office scheme kisan vikas patra kvp get 4 lakh instead of 2 lakh rupees check details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Nawab Malik | ‘भाजपला जितक्या वेळा पराभूत कराल, तितकी महागाई कमी होईल’ (व्हिडीओ)

Pune Crime | 25 वर्षीय महिलेच्या पतीमध्ये लैंगिक कमतरता ! सासर्‍यानं डायरेक्टच केलं लज्जास्पद कृत्य, पुण्याच्या हडपसर परिसरातील घटना

Diwali 2021 | दिवाळीत ग्रहांचा शुभयोग ! 4 राशीच्या जातकांना होईल ‘लाभ’, लक्ष्मीमातेची राहील विशेष कृपा