Bhokar News | प्रा. गौरव मिरकुटे यांचा अपघातात मृत्यू ! के. टी. आय. एल. कंपनी विरुद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा

मनसेच्या वतीने पोलिसांना निवेदन

भोकर : Bhokar News | भोकर येथील दिगंबरराव बिंदू महाविद्यालयातील तरुण प्राध्यापक गौरव मिरकुटे यांचा अर्धवट रस्त्याच्या कामामुळे अपघातात मृत्यू झाल्या प्रकरणी रस्त्याचे काम बेजबाबदारपणे करणाऱ्या के.टी.आय.एल.कंपनी विरुद्ध सदस्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी भोकर शहर मनसेच्या वतीनेपोलिसांना निवेदन देऊन करण्यात आलि. (Bhokar News)

भोकर तामसा राज्य महामार्गावर के.टी.आय.एल.कंपनीचे काम अर्धवट चालू आहे, काम चालू असल्याबाबतचे फलक लावण्यात आले नाहीत, वळण रस्ता दर्शविणारे फलक नाहीत, रस्त्याच्या बाजूला कठडे नाहीत, रस्ता जागो जागी खोदून ठेवलेला असल्यामुळे वाहने नीट चालवता येत नाही, केवळ काम उरकण्याचे घाई कंपनीने केल्यामुळे कामाचा दर्जा देखील राहिलेला नाही रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर धूळ साचून बाजूच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले वळणा रस्ता योग्य न केल्यामुळे वाहने नीट जात नाहीत दोन वाहनांना जाता येत नाही काम करीत असताना कंपनीने कुठल्याच नियमांचे पालन केले नाही त्यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला काम अर्धवट राहिल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना मोठा त्रास सहन करावा लागला सा.बां.उपविभागाने देखील नियमांचे पालन केलेले दिसत नाही अधिकाऱ्यांचेही या कामाकडे दुर्लक्ष झालेले दिसते. (Bhokar News)

कंपनीविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – मनसेची मागणी

भोकर येथील प्राध्यापक गौरव मिरकुटे हे दीपावली निमित्त आलेल्या आपल्या बहिणीस सोडून परत येत असताना 21 नोव्हेंबर 2023 रोजी रात्रीच्या वेळी योग्य प्रकारे रस्ता नसल्याने व फलक लावण्यात आले नसल्याने रस्त्यात असणारे खड्डे व चढ उतार रस्ता यामुळे गाडी उलटून अपघात झाला व त्यातच प्रा. मिरकुटे यांचा मृत्यू झाला सदर मृत्यू के. टी. आय. एल. कंपनीच्या बेजाबाबदार पणामुळे झाला असल्याने कंपनी विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मनसेचे शहराध्यक्ष माधव मेकेवाड यांनी दि 27 नोव्हेंबर 2023 रोजी पोलिसांना निवेदन देऊन केली आहे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे यावेळी बालाजी डवरे,अशोक निळकंठे,रामा गिनलवाड,विशाल जाधव,प्रवीण शेवाळे ,कृष्णा जाधव,अर्जुन जाधव सह अन्य उपस्थित होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | एसटी बस चालकाला शिवीगाळ करुन मारहाण, रिक्षाचालकाला अटक; लोणी काळभोर येथील घटना

Gold-Silver Rate Today | सोन्याचा नवा विक्रम! चांदी देखील महागली, जाणून घ्या आजचे दर

Maharashtra MLA Disqualification Hearing | ३१ डिसेंबरपर्यंत आमदार आपत्रता निर्णय अशक्य, सुप्रीम कोर्टाकडे राहुल नार्वेकर मुदतवाढ मागणार?