‘महाराज’ स्वतः साठी दुसऱ्यांचा बळी देत आहेत’, कमलनाथ सरकारमधील ‘या’ मोठ्या नेत्याचं वक्तव्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशमधील राजकीय गोंधळ थांबण्याचे नाव घेत नाही. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांमार्फत सतत आरोप- प्रत्यारोपाची फेरी सुरूच आहे. कमलनाथ मंत्रिमंडळातील मंत्री सज्जनसिंग वर्मा यांनी ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यावर जोरदार हल्ला केला आहे. ते म्हणाले की, महाराज स्वत: साठी इतरांचा बळी देत आहेत. सर्व १९ बंडखोर आमदारांना भेटायला बंगळुरुला जाण्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. ते म्हणाले की, कोणताही आमदार सिंधियासोबत जात नाही. कोणीही भाजपमध्ये जाण्यास तयार नाही.

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सज्जनसिंग वर्मा म्हणाले, ‘जे लोक भाजपाशी सौदा करीत होते, त्यांचा दम निघाला आहे. मी बेंगलुरूमधून आलो आहे, कोणताही आमदार सिंधियासमवेत जाण्यास तयार नाही. त्यांच्या रक्तवाहिन्यांत काँग्रेसचे रक्त आहे. वर्मा यांनी सिंधिया यांच्या पक्ष सोडण्याच्या निर्णयावर हल्ला करताना म्हंटले कि, “स्वतः महाराज बनण्यासाठी, इतरांचा बळी देणे, हे बरोबर नाही.”

‘फसवून बंगरुळला घेऊन गेले’
सज्जनसिंग वर्मा यांनीही भाजपवर कॉंग्रेसचे आमदार फसवून नेल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, अंधारात नेले गेलेले आमदारही आम्हाला फसवणूकीत घेतल्याचे सांगत आहेत. हे आमदार कॉंग्रेसला संकटात टाकू शकत नाहीत. ते कॉंग्रेसच्या नावावर जिंकून आले आहेत.

यापूर्वी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शोभा ओझा म्हणाले होते की, सीएम कमलनाथ कॉंग्रेसच्या बंडखोर आमदारांशी बोलणे झाले आहे. दरम्यान, कॉंग्रेसच्या 22 आमदारांवर बंडखोर म्हणून दावा केला जात आहे. या आमदारांमधून राजकीय हेरफेर होऊ नये म्हणून बेंगळुरूमध्ये १९ आमदारांना थांबविण्यात आले आहे. या राजकीय संघर्षाच्या दरम्यान, कमलनाथ सरकारवर संकट ओढवले आहे. त्याच बरोबर, कॉंग्रेसचे दिग्गज नेते मध्य प्रदेशात संपूर्ण पाच वर्षे सत्ता चालविण्याचा दावा करत आहेत. सद्यस्थितीत राज्यातील राजकीय परिस्थितीत एकच खळबळ उडाली आहे.