CM शिवराज सिंह चौहान यांची मोठी घोषणा ! आता MP मधीलच लोकांना मिळणार मध्यप्रदेशच्या सरकारी नोकऱ्या

भोपाळ : वृत्तसंस्था – मध्यप्रदेश सरकारने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सरकारी नोकऱ्या आता फक्त राज्यातील निवासी नागरिकांसाठीच आरक्षित राहणार. म्हणजे आता इतर राज्यातील लोकांना तेथील सरकारी नोकरी करता येणार नाही. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ही घोषणा केली आहे. त्यांनी याबाबतची कायदेशीर प्रक्रिया लवकरात लवकर करण्यात येईल असे देखील सांगितले.

एका व्हिडिओ मेसेज द्वारे त्यांनी सांगितले की, राज्यातील सरकारी नोकऱ्या आता फक्त राज्यातील निवासी नागरिकांसाठीच आरक्षित राहणार आहेत. त्यासाठीची कायदेशीर प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. अनेक निवडणुकांमध्ये या गोष्टीला उचलून धरण्यात आलं होतं. आता ही कायदेशीर प्रक्रिया कधी पर्यंत पूर्ण होणार याविषयी ते काहीच बोलले नाहीत.

उपनिवडणुकांच्या आधी मोठी घोषणा

मध्यप्रदेश काँग्रेस  मध्ये झालेल्या मतभेदानंतर पुन्हा सत्तेत आलेल्या शिवराज सिंह चौहान सरकारच्या नेतृत्वामध्ये बीजेपी उपनिवडणुकांच्या आधी ही तयारी सुरू आहे. मध्यप्रदेश मध्ये नोकरी मिळण्यासाठी तेथील स्थानिक रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र गरजेचे आहे, त्यामुळे ही सगळी योजना आगामी निवडणुकीला डोळ्यासमोर ठेऊनच करण्यात येत असल्याची शंका उपस्थित केली जात आहे. सरकार नोकरीचे आमिष दाखवून युवकांना आकर्षित करत असल्याचे बोलले जात आहे.