Bhumi Pednekar | प्रोडक्शन हाऊसने दिला होता भूमी पेडणेकरला अल्प पगार; तरी पहिल्या पगारामध्ये झाली होती खूश

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुड अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) ही सध्या चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. भूमीने तिच्या अदांनी व सौंदर्याने चाहत्यांना घायाळ केले असून तिच्या आगामी चित्रपटांची प्रतिक्षा प्रेक्षकांना असते. अनेक सामाजिक विषयांवर भूमीने चित्रपटामध्ये भूमिका साकारल्या असून आता ही यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. मात्र करिअरच्या सुरुवातीला तिला अगदी कमी मानधन (Bhumi Pednekar First Payment) मिळाले होते आणि तरी देखील ती त्यामध्ये खूश होती. ॲक्टिंग स्कूलमधून काढून टाकलेली भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) हिने यशराज फिल्म्स् मध्ये नोकरी केली आणि आता ती यशाच्या शिखरावर आहे.

अभिनेत्री भूमी पेडणेकर हिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिचे करियरच्या सुरुवातीच्या दिवसातील आठवणी सांगितल्या आहेत. भूमीला अगदी लहानपणापासून अभिनेत्री व्हायचे होते. तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भूमीच्या आईने तिच्या वडीलांच्या न कळत एज्युकेशन लोन घेऊन दिले होते. आणि तिने ॲक्टिंग स्कूलमध्ये ॲडमिशन घेतले होते. मात्र भूमीला तिच्या निष्काळजीपणामुळे ॲक्टिंग स्कूलमधून काढून टाकण्यात आले, त्यामुळे तिला या गोष्टीचे खूप वाईट वाटले. तेव्हाच यशराज फिल्म्सच्या (Yash Raj Films) कास्टिंग विभागात असिस्टंटची जागा रिक्त असल्याचे तिला समजले. मग भूमी तिथे नोकरी मिळवली. भूमीला यशराज फिल्म्समध्ये पहिला पगार सात हजार रुपये मिळाला भूमीने सांगितले की, ती तिच्या या पहिल्या कमाईने खूप उत्साहित झाली होती आणि तिने आपला पहिला पगार आईच्या हातात ठेवला होता.

अभिनेत्री भूमी पेडणेकर यशराज फिल्म्समध्ये त्यांनी कास्टिंग डायरेक्टर शानू शर्मा (Shanoo Sharma) यांची सहाय्यक म्हणून काम करत होती. आणि विशेष म्हणजे जेव्हा रणवीर सिंगने (Ranveer Singh) ‘बँड बाजा बारात’ (Band Baja Barat) या चित्रपटासाठी ऑडिशन दिले तेव्हा भूमी देखील तिथे होती. रणवीरने भूमीसमोर त्याचे ऑडिशन दिले. भूमीच्या म्हणण्यानुसार, बँड बाजा बारातसाठी रणवीरचे ऑडिशन इतके चांगले होते की त्याच संध्याकाळी आदित्य चोप्राने (Aditya Chopra) त्याला चित्रपटासाठी फायनल केले. या चित्रपटात रणवीरसोबत अनुष्का शर्मा (Anushka Sharma) मुख्य भूमिकेत होती. अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) हिला पहिला चित्रपट देखील यशराज फिल्म्सचा मिळाला. तिने ‘दम लगा के हईशा’ (Dum Laga Ke Haisha) या चित्रपटातून बॉलीवुडमध्ये दमदार पदार्पण केले. त्यानंतर आजतागायत तिची घौडदौड सुरू आहे. लवकरच ती ‘थॅंक्यू’ या चित्रपटामध्ये (Thank You Movie) झळकणार आहे. तसेच तिचे लेडी किलर (Lady killer), मेरी पटनाचा रिमेक आणि भक्त (Bhakta) हे चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Cough Problem | सर्दीत औषध घेणे किती योग्य किंवा किती दिवसानंतर उपचार करावा सुरू?

Prostate Cancer च्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करतात 43 टक्के पुरुष, तुम्ही करू नका ‘ही’ चूक

Constipation | मॅग्नेशियम बद्धकोष्ठता दूर करण्यात परिणामकारक उपाय आहे का? एक्‍सपर्टकडून जाणून घ्या

Diabetes – Mental Disease | ‘या’ मानसिक आजाराला बळी पडतो प्रत्येक दुसरा डायबिटीज रूग्ण,
लक्षात ठेवा ‘या’ महत्वाच्या गोष्टी