Bhumi Pednekar | अभिनेत्री भूमी पेडणेकरने एअरपोर्टवर पापाराझींना बघताच बदलला रस्ता; बॉयफ्रेंडसोबत झाली स्पॉट

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुड मधील एक प्रसिद्ध अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) ही मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. ती सध्या तिच्या रिलेशनशिप आणि अफेअरस् (Bhumi Pednekar Affair) मुळे चर्चिली जात आहे. नुकतेच तिला तिच्या कथित बॉयफ्रेंड यश कतारियासोबत स्पॉट करण्यात आले. यावेळी पापाराझींना अचानक बघताच भूमीने आणि तिच्या बॉयफ्रेंडने रस्ता बदलला. मात्र पुन्हा एकदा त्यांना एकत्र गाडीतून जाताना कॅमेऱ्यात कैद करण्यात आले आहे.

अभिनेत्री भूमी पेडणेकर हि सध्या बिल्डर यश कतारिया (Yash Katariya) याला चोरी छुपे डेट करत असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे. भूमी आणि यशला अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आले. (Bhumi Pednekar Realtionship) याआधी त्या दोघांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये भूमी आणि यश लिप लॉक करताना दिसत होते. हा व्हायरल व्हिडिओ सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) यांच्या रिसेप्शन पार्टीमधील होता. त्यानंतर त्यांनी पापाराझींपासून (Bollywood Paparazzi) अंतर ठेवण्यास सुरुवात केली. मात्र यावेळी ते मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) पुन्हा दिसून आले. पापाराझींमुळे ते एकत्र बाहेर आले नाहीत तर वेगवेगळे बाहेर आले. मात्र तरी पार्किंग एरिया मध्ये त्यांना पापाराझींनी गाठले.

अभिनेत्री भूमी पेडणेकरच्या (Bhumi Pednekar) अभिनयाचे आणि तिच्या निखळ सौंदर्याचे खूप लोक फॅन आहेत. भूमिचा कथित बॉयफ्रेंड पाहून मात्र आश्चर्याचा धक्का बसला. अनेकांनी याबाबत उलटसुलट कमेंट केल्या आहेत. तर काहींनी तिला सपोर्ट करत प्रेम हे चेहऱ्यावर नाही तर विचारांवर करायला हवे अशा भावना व्यक्त केल्या आहेत. अभिनेत्री भूमीचा रुमर्ड बॉयफ्रेंड यश कतारिया हा बिल्डर आहे. यश हा रकुल प्रीत सिंग (Rakul Preet Singh) आणि जॅकी भगनानी (Jackie Bhagnani) यांचा घनिष्ठ मित्र आहे.

Web Title :   Bhumi Pednekar | bhumi pednekar with rumoured boyfriend yash at mumbai airport

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा