Raju Shetti | राजू शेट्टींचा केंद्र सरकारवर घणाघात; म्हणाले, – “एफआरपीमध्ये केलेली वाढ म्हणजे डोंगर पोखरुन…”

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Raju Shetti | केंद्र सरकारने (Central Government) ऊसाच्या एफआरपी मध्ये (Sugarcane FRP) प्रतिक्विंटल 10 रुपयांची वाढ केली आहे. नव्या हंगामात ऊसाची एफआरपी 315 रुपये होणार आहे. याच मुद्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Saghtana) प्रमुख आणि माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

केंद्र सरकारने जी 10 रुपयांची वाढ केली ती वाढ कोणत्या आधारे केली. उत्पादन खर्च कोणता धरला. ही डोंगर पोखरुन उंदीर नव्हे तर उंदराची पिल्ली हाताला लागलेला प्रकार असल्याचे मत राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी व्यक्त केले. केंद्राने एफआरपीमध्ये (FRP) क्विंटलला 10 रुपये म्हणजे प्रति टनास शंभर रुपयाची वाढ केली. ही वाढ करुन शेतकऱ्यांना मोठी मदत केली असल्याचा सरकार डांगोरा पिटत आहे. वास्तविक पाहता केंद्राने 10 रुपयांची केलेली वाढ कोणत्या आधारे केली. उत्पादन खर्च कोणता धरला, असा सवालही त्यांनी केला.

पुढे राजू शेट्टी म्हणाले की, वास्तविक पाहता उत्पादन खर्चामध्ये मागील वर्षभरात जवळपास 33 टक्क्यांनी वाढ झाली. यात रासायनिक खतांची वाढ ही 22 टक्क्याहून होऊन अधिक वाढली आहे. यामुळे ऊसाच्या एफआरपीमध्ये झालेली वाढ ही केवळ 3.25 टक्के आहे. यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले. सध्या उसाची शेती ही तोट्याची शेती झाली. कृषी मूल्य आयोगामध्ये बसलेल्या विद्वानांनी 1 टन उसाचा खर्च 1570 रुपये दाखवला आहे. त्या उत्पादन खर्चावर आपण ऊस उत्पादक शेतकऱ्यांना (Sugarcane Farmers) दुप्पट पैसे देत आहोत, हा डांगोरा पेटवत आहे. कृषी मूल्य आयोगाने कोणत्या संशोधन केंद्रात किंवा भारतातील कोणत्या शेतकऱ्याच्या शेतात इतक्या खर्चात काढला हे दाखवून द्यावे, असे राजू शेट्टी म्हणाले. सरकारने साखर कारखानदारांना (Sugar Factory) खुश करण्यासाठी ही एफआरपी वाढवली असल्याचेही ते म्हणाले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ऊसावरील एमएसपीमध्ये (MSP) प्रति क्विंटल 10 रुपयांनी वाढवण्यात आली आहे. सरकारने वाढवलेली एमएसपी नवीन ऊस हंगामापासून (New Sugarcane Season) लागू होणार आहे. ही एमएसपी 1 ऑक्टोबर 2023 पासून सुरू होणार असून पुढील वर्षी 30 सप्टेंबर 2024 पर्यंत लागू राहणार आहे. नव्या हंगामात उसाची एफआरपी 315 रुपये होणार आहे.

Web Title : Raju Shetti | farmers leader raju shetti criticism on central govt for sugarcane frp swabhimani shetkari sanghatana

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा