१३ ऑगस्टला राजकारणात ‘बॉम्ब’ फुटणार, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची ‘भविष्यवाणी’ !

कोल्हापूर : पोलिसनामा ऑनलाईन – काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक आमदार आणि नेते एकीकडे भाजप आणि शिवसेनेत प्रवेश करत असताना सहकार मंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. याविषयी बोलताना त्यांनी म्हटले कि, अनेक आमदार प्रवेश करण्यास उत्सुक असून १३ ऑगस्ट रोजी राज्यातील राजकारणात मोठा भूकंप होणार आहे.

यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका करताना म्हटले कि, महाराष्ट्रातील ज्या २००-२५० घराण्यांनी राज्याला लुटले आहे त्या सर्वांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. सगळ्यांची बेहिशेबी संपत्ती बाहेर काढण्यात येणार असून कुणाकडे किती कारखाने आहेत ? त्याचबरोबर कुणी किती शेतकऱ्यांना लुटले या सगळ्याची चौकशी करण्यात येणार आहे.

यामुळे एकप्रकारे त्यांनी विरोधकांना इशाराच दिला आहे. शरद पवार यांच्यावर देखील त्यांनी मोठ्या प्रमाणात टीका केली. बारामतीमध्ये मुलगी, मावळमध्ये पार्थ पवार आणि आता विधानसभेला रोहित पवार यांना उभे करून शरद पवार घराणेशाही चालवत आहेत आणि भाजपवर घराणेशाहीचा आरोप करत आहेत. त्याचबरोबर आयकर विभागाच्या आणि ईडीच्या भीतीने आमदार भाजपमध्ये प्रवेश करत असल्याच्या आरोपांचे खंडन करताना त्यांनी म्हटले कि, हे काम काही एका दिवसात होत नसते, यासाठी २ ते ३ वर्षांचा कालावधी लागतो. त्यामुळे शरद पवार आणि विरोधकांचे हे आरोप त्यांनी फेटाळून लावले.

दरम्यान, १३ ऑगस्ट रोजी राज्यातील राजकारणात मोठा भूकंप होणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी म्हटले. त्याचबरोबर दर मंगळवारी मुख्यमंत्र्यांनी पक्षप्रवेशाचा दिवस ठरवला असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर १३ तारखेला कोल्हापूरमधील एक मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.

आरोग्यविषयक वृत्त –