जुलैमध्ये शाळा सुरू करण्याबाबत मोठा निर्णय, मुख्यमंत्र्यांनी दिली मान्यता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  सध्या राज्यात कोरोनाचा प्रभाव वाढत आहे. अशा परिस्थितीत शाळा सुरु कराव्या की नाही याबाबत चर्चा सुरु होती. मात्र आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिक्षण विभागाची महत्त्वाची बैठक घेतली असून त्यात शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरू करण्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता दिली आहे.

व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या या बैठकीत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड देखील उपस्थित होत्या. या बैठकीत ऑनलाईन, डिजिटल पद्धतीने प्रायोगिक स्तरावर शालेय शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा निर्णय झाला आहे.

ज्या भागात कोरोनाचा प्रभाव कमी झाला आहे, अशा भागांची वेगळी विभागणी करणार आहे. त्या भागात आवश्यक ती काळजी घेऊन शाळा सुरु करण्याची मान्यता मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली आहे. तसेच ज्या ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या आणि लांब असलेल्या शाळा देखील पुरेशी काळजी घेऊन सुरु करण्यात येणार आहेत.

हा निर्णय शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि शिक्षण विभागाचे इतर सचिव अधिकारी यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर घेण्यात आला आहे.

शालेय शिक्षण विभागाने ३ दिवसांपूर्वी शाळा जुलै महिन्यात सुरु करण्याचा निर्णय घेतला असताना त्याचे वेळापत्रक देखील जाहीर केले होते. विभागाच्या नव्या निर्णयाप्रमाणे नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग जुलै महिन्यापासून सुरू केले जाणार आहेत. तर सहावी ते आठवीचे वर्ग हे ऑगस्टपासून भरतील.