एमएनजीएल डिस्ट्रिक्ट रेग्युलेटिंग स्टेशनमध्ये आग

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन – गॅस पाईपलाईन लिकेज झाल्याने भोसरी एमआयडीसी येथील अनंत एंटरप्राईजेस यांच्या एमएनजीएल डिस्ट्रिक्ट रेग्युलेटिंग स्टेशनमध्ये आग लागली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मोठे नुकसान झाले आहे. ही घटना आज सकाळी पावणेसातच्या सुमारास घडली.

भोसरी एमआयडीसी येथील एमएनजीएल डिस्ट्रिक्ट रेग्युलेटिंग स्टेशनमध्ये इनलेट गॅस सप्लाय स्टेशन आहे. त्या स्टेशनमध्ये सकाळी सहा वाजून 45 मिनिटांनी गॅस गळती झाल्यामुळे आग लागली. अग्निशमन विभागाला घटनेची माहिती मिळताच संत तुकाराम नगर अग्निशामक केंद्राचे दोन बंब, भोसरी उपकेंद्राचा एक बंब यांच्यासह उप अग्निशामक अधिकारी अशोक कानडे, शांताराम काटे, लिडिंग फायरमन संजय ठाकूर, फायरमन कैलास वाघिरे, सरोष फुंडे, अमोल चिपळूणकर, कृष्णा कदम, कैलास डोंगरे, पुंडलिक भुतापले, संभाजी दराडे, नितीन गोगोले, वाहन चालक विशाल बाणेकर, देवा जाधव हे घटनास्थळी तात्काळ दाखल झाले.

काही वेळ कुलिंगचे काम केल्यानंतर एमएनजीएल कंपनीला घटनेची माहिती देण्यात आली. कंपनीकडून इनलेट गॅस बंद करण्यात आला. त्यामुळे आग आटोक्यात आली. वेळीच मदत मिळाल्याने मोठी दुर्घटना टळली. सुदैवाने घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना मिळणार पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण

‘ही’ पेये प्यायल्यास वजन होईल कमी, शरीराला मिळेल ऊर्जा

 ‘वजन’ कमी करताना घाई करू नका, हळूहळू करा कमी

 ‘हे’ नैसर्गिक उपाय केल्यास घेता येईल गाढ झोप

 रक्तचाचणी द्वारे कळू शकते आयुर्मान आणि भविष्यातील आजार