अभिमानास्पद ! ‘मॉस्को’मध्ये उभारणार ‘इस्त्रो’चे कार्यालय, मोदी सरकारचा महत्वपूर्ण ‘निर्णय’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बुधवारी केंद्रीय कॅबिनेटच्या मिटिंगमध्ये अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. आत शेतकरी, जम्मू काश्मीर, उच्च न्यायलाय, इस्त्रो आणि चिट फंड सारखे अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या सर्वाच महत्वपूर्ण निर्णयात एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला तो म्हणजे इस्त्रोशी संबंधित. इस्त्रोने कायमच आपल्या महत्वपूर्ण मोहिमेत यश मिळवून भारताची मान उंचावली आहे. याच भारतीय अवकाश संशोधन संस्थे संबंधात केंद्रीय कॅबिनेटमध्ये महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

मॉस्कोत उभारणार कार्यालय
आता भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे कार्यालय आता थेट रशियामध्ये उभारण्याचा निर्णय केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे आता इस्त्रोचे दुसरे कार्यालय रशियांच्या मॉस्कोमध्ये सुरु होणार आहे.

या कारणाने उभारणार कार्यालय
हा निर्णय यासाठी घेण्यात आला आहे की या माध्यमातून इतर देशांबरोबर अंतराळ तंत्रज्ञानाच्या प्रकरणात सहयोग आणि संपर्क साधता येईल. बुधवारी घेण्यात आलेल्या या निर्णयानंतर आता रशिया आणि त्याच्या आसपासच्या देशांशी अंतराळ तंत्रज्ञानाच्या प्रकरणात सहयोग आणि संपर्कासाठी मॉस्कोमध्ये एक तंत्रज्ञान संपर्क कार्यालय तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

चांद्रयान – २ मोहिम चंद्राच्या दक्षिणी ध्रुवावर लॅन्डिंग करण्यासाठी हे भारताचे पहिली अंतराळ मोहिम आहे. २२ जुलैला चांद्रयान – २ चे प्रक्षेपण करण्यात आले. चंद्राच्या जमीनीची तपासणी करण्यासाठी स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. ही मोहिम १५ जुलैलाच लॉन्च होणार होती. परंतू तांत्रिक अडचणींनी हे लॉन्चिंग रोखण्यात आले होते. या मोहिमेनंतर आता भारत चंद्रावर सॉफ्ट लॅन्डिंग करणाऱ्या देशांच्या क्लबमध्ये सहभागी होईल. यात आधी रशिया, अमेरिका, चीन यांच्या समावेश आहे त्या रंगेत आता भारत देखील जाऊन बसेल.

आरोग्यविषयक वृत्त –

७ दिवसात आत जाऊ शकते पोट, ‘हे’ ११ उपाय आहेत ‘रामबाण’
आरोग्य समस्यांवर ‘हे’ १० छोटे-छोटे घरगुती उपाय, जाणून घ्या
भारतात HIV पेक्षाही ‘हिपॅटायटीस’ अधिक घातक, पावसाळ्यात विशेष काळजी घ्या
‘सेक्स पॉवर’ कमी झाल्यास बिघडू शकते वैवाहिक जीवन, करा ‘हे’ खास उपाय
अशाप्रकारे परत मिळू शकते त्वचेची चमक, ‘हे’ ४ उपाय आवश्य करा
औषधी न घेता आहाराने लिव्हर ठेवा ठणठणीत, जाणून घ्या ११ उपाय