Video : बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांना FB Live करत जीवे मारण्याची धमकी ! FIR दाखल

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब अशी की, फेसबुक लाईव्ह करण्यात त्यांनी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे असा आरोप आहे. नवी मुंबईच्या पनवेल ठिकाणच्या नंदू उर्फ बाबा पाटील यांनं ही धमकी दिल्याची माहिती आहे. आता त्याच्या विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रशांत चंद्रकातं खराडे (वय 40) रा. शिवाजी आखाडा, बार्शी यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. बार्शी पोलीस ठाण्यात भादंवि कलम 507 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र राऊत यांना अशी धमकीही देण्यात आली आहे की, शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर याच्या विरोधात राजकारण कराल तर मुंबईतून बाहेर पडू देणार नाही असंही या तक्रारीत म्हटलं आहे. इतकंच नाही तर त्या लाईव्ह करणाऱ्या व्यक्तीनं राजेंद्र राऊत यांच्यासह नगरसेवक अमोल चव्हाण यांनाही धमकावलं आहे असाही उल्लेख तक्रारीत आहे.

तुम्ही मुंबईत आल्याचं समजलं तर मुंबईतून बाहेर पडू देणार नाही. भाऊसाहेब आंधळकर याच्या विरोधात राजकारण केलं किंवा त्यांच्या केसाला धक्का लागला तर गाठ माझ्याशी आहे. तुम्हाला जिवंत सोडणार नाही. तुम्हाला ओपन चॅलेंज करतो अशी धमकी दिल्याचं तक्रारीत म्हटलं आहे अशी माहिती आहे.