SBI देतय ‘हे’ खास कर्ज ! अवघ्या 45 मिनिटांत मिळतील 5 लाख रुपये, 6 महिने EMI देण्याची आवश्यकता नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे लोकांचा आर्थिक त्रास वाढत आहेत. हे लक्षात घेता स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) सामान्य लोकांसाठी एक विशेष योजना आणली आहे. आपत्कालीन वैयक्तिक कर्जासाठी एसबीआय एक विशेष ऑफर देत आहे, त्या अंतर्गत कमी व्याज दरावर 5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध आहे. या ऑफरचे वैशिष्ट्य म्हणजे ग्राहकांना पहिल्या 6 महिन्यांपर्यंत कोणताही ईएमआय भरावा लागणार नाही.

https://twitter.com/TheOfficialSBI/status/1258255953293606918

एसबीआयच्या म्हणण्यानुसार ग्राहक घरी बसूनच कर्जासाठी अर्ज करु शकतात. हे कर्ज अवघ्या 45 मिनिटांत पाठविले जात असल्याचे बँकेचे म्हणणे आहे. कर्जाला वार्षिक 10.5 टक्के दराने व्याज द्यावे लागेल. हा व्याज दर अन्य वैयक्तिक कर्जावरील व्याजापेक्षा कमी आहे. वैयक्तिक कर्जासाठी 2 लाख रुपयांपर्यंत रक्कम मिळू शकते असे बँकेने म्हटले आहे. तसेच निवृत्तीवेतन कर्ज म्हणून अडीच लाख रुपयांपर्यंत आणि सर्व्हिस क्लास म्हणून 5 लाखांपर्यंत कर्ज मिळू शकते.

अर्ज कसा करावा

एसबीआयची अधिकृत वेबसाइट onlinesbi.com आणि sbi.co.in नुसार ग्राहक YONO अ‍ॅपवर जाऊन अर्ज करू शकतात. मोबाईल फोनमध्ये योनो एसबीआय अ‍ॅप डाउनलोड करावे. त्यानंतर प्री-अप्रूव्ड लोन वर क्लिक करा. कर्जाची मुदत आणि रक्कम निवडा. बँक आपल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर ओटीपी पाठवेल. आता ओटीपी प्रविष्ट करा. ओटीपीमध्ये टाकल्यानंतर कर्जाची रक्कम तुमच्या बचत खात्यात वर्ग केली जाईल.

कर्ज घेण्यापूर्वी हे काम करा
कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी, आपल्याला 567676 वर एसएमएस पाठविणे आवश्यक आहे. SMS चा फॉर्मेट SMS PAPL <SPACE> <last 4 digits of SBI a/c no.> to 567676 . आहे. बँक आपल्या एसएमएसला उत्तर देईल. ज्याद्वारे आपण किती कर्ज मिळवू शकता हे समजेल.