पूरग्रस्त भागात 100 % कर्जमाफी करण्यात यावी : शरद पवार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पूरग्रस्त भागात १००% कर्जमाफी करण्यात यावी, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. पुण्यातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पवार म्हणाले की, महापुरामुळे शेतीचे आणि पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे. या पुरामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. पूरग्रस्त भागात १०० % कर्जमाफी करण्याच निर्णय केंद्र आणि राज्य सरकारने घ्यावा. पूरग्रस्त भागात मदत करण्यासाठी शासकीय यंत्रणा कमी पडल्याचेही त्यांनी सांगितले. सांगली- कोल्हापूर हा दुधाचा पट्टा म्हणून ओळखला जातो. त्यामुळेच दोन दिवसात मोठ्या प्रमाणात दुधाची आवक घटली, असे देखील पवार यांनी म्हंटले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पूरग्रस्तांना मदत
पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पूरग्रस्तांना मदत करणार असल्याचे सांगितले. त्यांनी म्हंटले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व लोकप्रतिनिधींचा १ महिन्याचा पगार पूरग्रस्तांना मदत म्हणून देण्यात येणार आहे. यासंबंधी ५० लाखाची मदत लवकरच देण्यात येईल. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत घेऊन पूरग्रस्तांना मदत करण्यासंबंधी घोषणा केली. सांगली – कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार तसेच आमदार १ महिन्याच्या पगाराची आर्थिक मदत करणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे. मुंबईतील पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली आहे. आज दुपारी अडीच वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई येथील कार्यालयात मलिक यांनी पत्रकार परिषद घेतली.

आरोग्यविषयक वृत्त