Bihar Crime | शाळेतून परतणाऱ्या वृद्ध शिक्षकाला महिला पोलिसांकडून बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल

बिहार : वृत्तसंस्था – Bihar Crime | सोशल मीडियावर आपण अनेक व्हिडिओ व्हायरल झाल्याचे पहिले असतील. यामध्ये काही चांगले तर काही धक्कादायक असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक संतापजनक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये दोन महिला पोलिस एका वृद्ध व्यक्तीला काठ्यांनी मारहाण करताना दिसत आहे. याचा व्हिडिओ त्या ठिकाणी असलेल्या लोकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आणि सोशल मीडिययावर व्हायरल केला. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी या महिला पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पीडित वृद्ध व्यक्ती हि पेशाने शिक्षक आहे. (Bihar Crime)

 

काय आहे संपूर्ण प्रकार?

हा संतापजनक प्रकार बिहारमधील कैमूर या ठिकाणी घडला आहे. यामध्ये दोन महिला पोलिसांनी रस्ता ओलांडणाऱ्या एका वयस्कर शिक्षकाला मारहाण केली आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, वृद्ध व्यक्ती त्या पोलिसांना, ‘मला का मारताय ? मी काय चुक केली आहे, मला सांगा, मी सायकलवरून रस्ता ओलांडत होतो,’ असं म्हणताना दिसत आहे. पण या महिला पोलिसांनी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत बेदम मारहाण केली आहे. (Bihar Crime)

 

 

या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वृद्ध व्यक्ती त्या पोलिसांना, ‘मला का मारताय ? मी काय चुक केली आहे,
मला सांगा, मी सायकलवरून रस्ता ओलांडत होतो,’ असं म्हणताना दिसत आहे.
पण या महिला पोलिसांना ३ महिन्यांसाठी निलंबित केलं आहे अशी माहिती एसपी ललित मोहन शर्मा यांनी दिली आहे.

 

 

Web Title :- Bihar Crime | old teacher returning from school beaten up by women policemen video viral in bihar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा