‘सुशांत बिहारचा नव्हे तर देशाचा मुलगा होता’, निवडणूकीचा मुद्दा नसल्याचे देवेंद्र फडणवीसांनी पाटण्यामध्ये सांगितलं

पाटणा : वृत्तसंस्था – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी बिहारची राजधानी पाटणामध्ये पोहचले. येथे त्यांनी सुशांत सिंह राजपूत केस, कंगना राणावतच्या विरूद्ध बीएमसीच्या कारवाईबाबत भाष्य केले. बिहार निवडणुकीत भाजपाचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, सुशांत सिंहचा मुद्दा निवडणुकीचा मुद्दा नाही. तो बिहारचाच नव्हे, तर देशाचा मुलगा होता. देवेंद्र फडणवीस यांनी यासोबतच कंगना राणावतच्या पीओकेच्या वक्तव्यावर सुद्धा प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, मुंबईची पीओकेशी तुलना केली जाऊ शकत नाही, असे म्हणणे चुकीचे होते.

फडणवीस म्हणाले, सर्वसामान्य माणसांना वाटले की, सुशांत केसचा तपास झाला पाहिजे. याच कारणामुळे सीबीआय, एनएसबी तपास करत आहे. पाटणामध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते. फडणवीस पुढे म्हणाले, सुशांतच्या मृत्यूनंतर न्याय मिळण्याची शक्यता वाटत नव्हती, मीडियाद्वारे तपास समोर आला, ड्रग्ज अँगलसुद्धा समोर आला. आमच्यासाठी सुशांतचा मुद्दा निवडणुकीचा मुद्दा नाही. सुशांत बिहारचाच नव्हे, तर देशाचा मुलगा होता.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, भाजपा कंगना राणावतच्या सोबत उभी आहे. आम्ही तिचे समर्थन करतो. महाराष्ट्रातील सरकार हे विसरले आहे की, त्यांची लढाई कोरोनाशी सुरू आहे, कंगनाशी नाही. सरकारला जबाबदारी समजली पाहिजे.

नीतीश सरकारचे कौतूक करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, बिहारमध्ये एनडीएचे सरकार चांगले काम करत आहे. केंद्रात मोदी सरकार आणि बिहारमध्ये नीतीश कुमार सरकार दोघांनी खुप काम केले आहे. जर लालू प्रसाद यादव यांच्या सरकारशी तुलना केली तर अंतर स्पष्टपणे दिसते.