Bihar Election Results : काँग्रेसच्या घसरगुंडींचा तेजस्वींना बसला फटला – शिवसेना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – तेजस्वी यादव यांच्यामुळे बिहारची निवडणूक जास्तच रंगतदार झाली. पंतप्रधान मोदी या बलाढ्य नेत्यांसमोर व बिहारमधील सत्ताधार्‍यांच्या समोर तो डगमगला नाही. बिहारच्या निवडणुकीमुळे देशाच्या राजकारणाला तेजस्वी नावाचा नवा चेहरा मिळाला.

या पार्श्वभूमीवर सामना अग्रलेखातून शिवसेनेने यादव यांचे केले कौतुक…
ही लढत फारच चुरशीची झाली. ती फक्त तेजस्वी यादव यांनी केलेल्या अफाट प्रचारसभामुळे. तेजस्वी यांनी एक महाआघाडी बनवली. त्यात कॉंग्रेस डावे वगैरे पक्ष आले. पण त्यात मोठ्या प्रमाणात फटका तेजस्वी यादव यांना काँग्रेसमुळे बसला. डाव्या पक्षांनी कमी जागा लढवून चांगली कामगिरी पार पाडली; मात्र तसे काँग्रेस जमलं नाही.

सामना अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे….
बिहारच्या विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलं होतं. अटीतटीची लढत होईल असे चित्र दिसलं. मतदानानंतरचे एक्झिट पोल वगैरे दाखवण्यात आले. निकालही तसेच आलेच. अटीतटीच्या लढतीत एनडीए म्हणजे भाजप नितीशकुमार पुढे आले. पण नितीशकुमार यांचे जदयूमागे पडले.

तेथील राजकारणात नव्या तेजस्वी पर्वाची सुरुवात झाली. यादव हा नवा तरुणाचा चेहरा उदयास आला. तेजस्वी यादव ने राष्ट्रीय लोकशाही आघाडी समोर दमदार आव्हान उभे केले. त्याने पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री नितीशकुमार, अमित शहा व संपूर्ण सत्ता मंडळांची एक हाती लढत दिली. बिहारवर पुन्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे राज्य आलं. नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता 50 जागांचा टप्पा गाठता आला नाही. भाजपने सत्तरी पार केली नितीश कुमार यांच्या पक्षात कमी जागा मिळाल्या तरी तेच मुख्यमंत्री होतील असे अमित शहा यांना जाहीर करावं लागलं. तसा शब्द 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेला दिला होता तो शब्द पाळला गेला नाही. महाराष्ट्रात नवे राजकीय महाभारत घडले आता कमी जागा मिळूनही नितीशकुमारांचा दिलेला शब्द पाळला गेला तर त्याचे श्रेय शिवसेनेला द्यावं लागेल. बिहारचे राजकारण हे अनेक वर्ष लालू यादव किंवा नितीशकुमार यांच्या भोवती फिरत राहिलं. तेजस्वी च्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यात जिवंतपणा होता. प्रचारात विकास रोजगार आरोग्य शिक्षण हे मुद्दे आणले होते.