मुख्यमंत्री नितीश कुमारांचा संयम सुटला, म्हणाले – ‘तुमच्या आई-वडिलांना प्रश्न विचारा’

पोलीसनामा ऑनलाईन – राजदचे (Rashtriya Janata Dal) नेते तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) आणि लोकजनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग (Chirag Paswan) पासवान यांच्याकडून मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर प्रचारादरम्यान निशाणा साधला जात आहे. यादव यांना प्रत्युत्तर देताना बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार (CM Nitish Kumar) यांचा संयम सुटला. तेजस्वी यादव यांच्यावर टीका करताना, ते म्हणाले की, तुम्हाला संधी होती, तेव्हा एखादे शाळा-महाविद्यालय उभारले का, हा प्रश्न तुमच्या आई-वडिलांना विचारा अशी टीका केली.

बिहारच्या पहिल्या टप्प्यातील 71 जागांवर 28 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. बिहारमध्ये जोरदार (Bihar Legislative Assembly election) प्रचार सुरू आहे. याच दरम्यान बेगुसराय येथील रॅलीमध्ये संबोधित करत होते. राजकारणात संयमी भाषणशैलीसाठी नितीशकुमार प्रसिद्ध आहेत. मात्र, शनिवारी निवडणूक प्रचारात बेगुसराय येथील रॅलीत नितीशकुमार यांचा संयम सुटला. ‘तुम्हाला सरकार बनविण्याची संधी मिळाली. तुम्ही बिहारमध्ये काय केले एखादं शाळा-महाविद्यालय बांधले का? आज तुम्हाला शिकायचे आहे, तर सरकार असताना शाळा-महाविद्यालय बांधले का, हा प्रश्न तुमच्या आई-वडिलांना विचारा. शिक्षण, आरोग्यव्यवस्था यावर भर देण्याऐवजी जंगलराज’वर भर देणाऱ्यांनी नोकरी व विकासावर बोलणे म्हणजे थट्टाच आहे.

प्ररचारादरम्यान नितीश यांच्याकडून लालूप्रसाद यादव (laluprasad-yadav) व राबडीदेवी सरकारच्या कार्यकाळावरून निशाणा साधला ते म्हणाले की, सत्तेत असताना यांनी पैसा खाल्ला. तुरुंगात जावे लागल्यानंतर खुर्चीवर पत्नीला आणून बसवलं. आपल्या बिहारमध्ये हे होत होते. पण, आता माझ्या सरकारमध्ये एखादे चुकीचे कृत्य केले, कायदा मोडला, तर त्याला थेट तुरुंगात जावे लागतं, असेही नितीशकुमार म्हणाले.