Bihar Election : पाटण्यात BJP ची बैठक सुरू, नंतर फडणवीस आणि नितीश कुमार यांची मिटींग, दिल्लीत चिराग पासवान आणि अमित शहांची चर्चा

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   बिहार विधानसभा निवडनुक तोंडावर आली आहे. मात्र बिहारमध्ये सुद्धा जागेचा तिढा अजून पुर्णतः सुटलेला दिसत नाही. याच संदर्भामध्ये काल अमित शहा आणि लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान यांच्यात दिल्लीमध्ये बैठक झाली. परंतु यामध्ये जागेचा तिढा सुटला नाही. याबद्दल दोन दिवसात घोषणा केली जाईल अशी माहिती बिहार चे बीजेपी प्रभारी भुपेंद्र यादव यांनी दिली. तर आज बिहार मध्ये बिहार निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस आणि बिहार चे मुख्यमंत्री व जेडीयु पक्षाचे अध्यक्ष नितीशकुमार यांच्या उपस्थितीत एनडीए ची बैठक होणार आहे. ज्यामध्ये जेडीयु पक्षाच्या जागेच्या संबंधात अंतिम निर्णय होणार आहे. अशी महिती समोर येत आहे की नितीशकुमार हे बीजेपी चे आमदार असलेल्या कित्येक जाग्यांवर दावा करत आहेत. त्यामुळे आजची होणारी बैठक ही लक्षवेधी असणार आहे. दिल्लीत झालेल्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांना बिहार निवडणूक प्रभारी केले आहे तेंव्हा फडणवीस म्हणाले की, जेडीयु सोबत आम्ही एकतृतीयांश बहुमताने सत्तेत येवू असा दावा फडणवीस यांनी केला आहे.

परंतु आता यासाठी जागेचा तिढा सोडणे फडणवीस यांच्यासमोर मोठे आव्हान आहे. कारण काल दिल्लीत झालेल्या बैठकीतून अशी माहिती आहे की चिराग पासवान यांना विधानसभेच्या 36 जागा विधानपरिषदेच्या 2 जागा व एक राज्यसभेत जागा देऊ केल्या आहेत परंतु पासवान यांनी 42 जागेचा हट्ट धरला आहे व असे न झाल्यास आपण 143 जागा लढवणार आहोत अशीही माहिती समोर येत आहे. आणि त्यामुळे आज होणाऱ्या बैठकीमध्ये नेमका काय निर्णय होतो याकडे लक्ष वेधले आहे.